शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सोयाबीनच्या नऊ हजारांवर तक्रारी, गुन्हे मात्र दोनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:52 IST

अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले.

ठळक मुद्देसर्वाधिक तक्रारी यवतमाळातकंपन्यांची मुजोरी, प्रमुख वितरकांविरुद्ध शेतकऱ्यांचा रोष कायम

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदाच्या हंगामात उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी मारले. त्यामुळे एकट्या अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले. ते पाहता बियाणे कंपन्यांना कृषी विभाग पाठीशी तर घालत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे १४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन ४० ते ५० रुपये किलोने विकला. सोयाबीनचे बियाणे मात्र ८० ते ९० रुपये किलो दराने शेतकऱ्यांना खरेदी करावे लागले. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी दाग-दागिना मोडून, उसनवारी करून पैशाची तजवीज केली व नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांची खरेदी केली. परंतु प्रत्यक्षात हे महागडे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक झाली. आता शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे. या उलट काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले आणि ते उगवलेसुद्धा. त्यामुळे कंपन्यांच्या बियाण्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

कृषी केंद्रांना हवे पोलीस संरक्षणसोयाबीनचे पेरलेले बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये धडक दिली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण मागण्याची वेळ आली.

तक्रारींचे ६५ टक्के पंचनामे उरकलेशेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बोगस बियाण्यांबाबत तक्रारींचा सपाटा लावला आहे. अमरावती विभागात गत आठवड्यापर्यंत नऊ हजार ३८० तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. हा आकडा दहा हजारांवर जाणार आहे. त्यातील सर्वाधिक ४ हजार ७४९ तक्रारी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. विभागात या तक्रारींचे ६० टक्के पंचनामे उरकण्यात आले आहे.

कृषिमंत्र्यांचे आदेश, पण गुन्हे नाममात्रबोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीने एक तर शेतकऱ्यांना बियाणे बदलवून द्यावे किंवा दोन दिवसात नुकसानभरपाई द्यावी असे आदेश कृषी मंत्र्यांनी जारी केले होते. जी बियाणे कंपनी या तडजोडीला तयार नसेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले गेले होते.

केवळ बुलडाणा, वाशिममध्ये गुन्हाअमरावती विभागात आतापर्यंत केवळ बुलडाणा जिल्ह्यात ग्रीन गोल्ड विरुद्ध तर वाशिम जिल्ह्यात ईगल कंपनीविरुद्ध प्रत्येकी एक गुन्हा नोंदविला गेला. नऊ हजार तक्रारी आणि दोनच गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.शेतकऱ्यांना तत्काळ बियाणे बदलवून मिळावे, खरिपाचा हंगाम निघून जावू नये, शेतकºयाचे नुकसान होऊ नये हा प्रयत्न आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवली जावू शकते.- सुभाष नागरेसहसंचालक (कृषी), अमरावती

टॅग्स :agricultureशेती