शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

अधिक वयाची खेळाडू खेळविल्याची तक्रार

By admin | Updated: August 29, 2015 02:43 IST

येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात कोषटवार विद्यालय पुसदच्या संघाने १५ वर्षाच्या खेळाडूला खेळविल्याची तक्रार..

शालेय क्रीडा स्पर्धा : एकाच खेळाडूंचे तीन वेगवेगळे जन्मवर्षयवतमाळ : येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात कोषटवार विद्यालय पुसदच्या संघाने १५ वर्षाच्या खेळाडूला खेळविल्याची तक्रार यवतमाळच्या पोदार स्कूल संघाच्या क्रीडा शिक्षकाने केली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सुरू आहेत. २४ आॅगस्टला १४ वर्षाआतील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. अंतिम फेरीत कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ संघांनी प्रवेश केला. अंतिम सामन्यात पुसद संघाने २-० गोलने विजय प्राप्त केला. दरम्यान पोदार स्कूल संघाने पुसदच्या संघातील रेवती संतोष कोकारे या खेळाडुंची जन्मतारिख चुकीची असल्याची रितसर तक्रार स्पर्धा आयोजकांकडे केली. कोकारे ही खेळाडू नुकत्याच झालेल्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर खेळली. या स्पर्धेत तिची जन्मतारिख १५ मे २००० आहेत तर याच वर्षीच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत २००३ हे जन्मवर्ष तर गतवर्षीच्या जिल्हा स्पर्धेत २००२ हे जन्मवर्ष असल्याचे प्रमाणपत्र कोषटवार विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल जोशी यांच्या स्वाक्षरीसह प्रमाणित करून दिले आहे. शिवाय याच प्रमाणपत्राच्या आधारे २०१४ मध्ये तत्कालिन प्रभारी क्रीडा अधिकारी अशोक खंडारे व २०१५ मध्ये अविनाश पुंड या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनीही स्वाक्षरी करून संघाची यादी प्रमाणित केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोषटवार विद्यालय पुसद यांच्या कागदपत्राच्या आधारे पोतदार संघाने तक्रार दिली आहे. तीन वेगवेगळे बोगस जन्मवर्ष दाखवून पुसद संघाने शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित संघावर कार्यवाही करून आमच्या संघाला विजयी घोषित करावे, अशी मागणी पोतदार संघाने तक्रारीत केली आहे. तुर्तास दाखल झालेल्या तक्रारीवर क्रीडा कार्यालयाने निर्णय राखून ठेवला आहे. जिल्हा शालेय स्पर्धेत अनेक संघात आवश्यकतेपेक्षा अधिक वयाचे खेळाडु खेळविले जातात. संघातील खेळाडुंचे ओळखपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र तपासण्याची जबाबदारी क्रीडा कार्यालयाकडे आहे. मात्र कागदपत्रे अपवादानेच तपासले जात असल्याचे दिसून येते. (क्रीडा प्रतिनिधी)