शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे

By admin | Updated: May 31, 2014 23:48 IST

आज सर्वत्र शिक्षणाचे मोठय़ा प्रमाणात बाजारीकरण झाल्यामुळे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांंची मोठी फजिती झाली आहे. पैशाअभावी महागडे शिक्षण घेणे शक्य नसल्याने पुसद परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी

उच्च शिक्षणासाठी पैसा नाही : युवकांसाठी बेरोजगारी दूर करण्याचा एकमेव उपायपुसद : आज सर्वत्र शिक्षणाचे मोठय़ा प्रमाणात बाजारीकरण झाल्यामुळे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांंची मोठी फजिती झाली आहे. पैशाअभावी महागडे शिक्षण घेणे शक्य नसल्याने पुसद परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. सध्या ग्रामीण विद्यार्थ्यांंमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात गरीब विद्यार्थ्यांंची संख्या जास्त आहे. पदवीपर्यंंतचे शिक्षण पूर्ण होऊन डीएड, बीएड, एमए, एमएसस्सी पार पडल्यानंतर नोकरीचे वांधे निर्माण होतात. काही विद्यार्थ्यांंकडे पैसा असेल तर शिफारस नाही तर काहींकडे शिफारस आहे पण लाखो रुपये नाही. १५ ते २0 लाखापर्यंंत नोकरीसाठी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांसमोर उभा ठाकला आहे. शेवटी त्यांच्यासमोर एकच पर्याय उरला, तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा. त्यामुळे काही काळापूर्वी स्पर्धा परीक्षांची फारशी माहिती नसणार्‍या विद्यार्थ्यांंनी त्याची मोठय़ा प्रमाणात माहिती घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंची ही गरज लक्षात घेऊन पुसद परिसरात स्पर्धा परीक्षांचे केंद्र उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.जीवनात यशस्वी होण्याची आशा बाळगून विद्यार्थी शहराच्या ठिकाणी खोली करून स्पर्धा परीक्षाच्या वर्गात प्रवेश घेतात.वाढत्या देणगी शुल्कामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेत आहेत. त्यामुळे गुणवत्ता प्रधान राष्ट्रनिर्मितीसही मदत होईल, यात शंका नाही.स्वत:मधील क्षमता ओळखून विद्यार्थी कोणताही मोबदला न देता प्रथम श्रेणीचे अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा बाळगत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतही दिवसेंदिवस आणखी स्पर्धा वाढणार हे नक्कीच. तरी पण ग्रामीण गरीब विद्यार्थ्यांंचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा कल वाढत आहे. सहाव्या वेतन आयोगामुळे शिक्षकी पेशात देणगी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.तेवढी रक्कम देऊन नोकरी करण्यापेक्षा तेवढय़ा पगारात तीन ते चार गरीब होतकरू विद्यार्थी जीवन काढू शकतात. त्यामुळे बेरोजगारी तरी कमी होण्यास मदत होईल. अन्यथा गरीब गरीबच राहील व श्रीमंत दिवसेंदिवस श्रीमंतच होत जाईल, अशी चर्चा सुशिक्षित बेरोजगार करीत आहेत. शिकून पदव्या घेऊन गुणवत्तेला कुणीच विचारत नसून ‘पैसा बोलता है’ हा प्रकार असल्यामुळे आपला वाली ‘स्पर्धा परीक्षा’ असल्याची भावना मनाशी बाळगून विद्यार्थी स्पर्दा परीक्षेकडे  वळत आहेत.  (तालुका प्रतिनिधी)