शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कृषीच्या मूल्यांकनाअभावी अडला शेतजमिनीचा मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 20:58 IST

एवढेच नव्हे तर रेल्वेसाठी लागणारी अतिरिक्त जागाही भूसंपादनाच्या कुठल्याही प्रक्रियेशिवाय ताब्यात घेवून काम सुरू करण्यात आले. हा प्रश्न कळंब येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मांडला आहे.

ठळक मुद्देरेल्वेसाठी भूसंपादन; कळंब येथे अतिरिक्त कामासाठी जमीन घेतली

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मूल्यांकन अहवाल कृषी विभागाने सादर केला नाही. परिणामी शेतजमीन गेलेले शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. एवढेच नव्हे तर रेल्वेसाठी लागणारी अतिरिक्त जागाही भूसंपादनाच्या कुठल्याही प्रक्रियेशिवाय ताब्यात घेवून काम सुरू करण्यात आले. हा प्रश्न कळंब येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मांडला आहे.थाळेगाव(पुनर्वसन) येथील २३ शेतकरी गेली काही महिन्यांपासून आपला प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. सोमवारी पुन्हा त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला निवेदन सादर केले. गजानन खेर्डे, प्रदीप ढुमणे, सचिन माहुरे, प्रवीण गुल्हाने, महादेव लढी, आकाश कुटेमाटे, मोरेश्वर मडावी, रोशन गोरे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी हे निवेदन सादर करण्यात आले आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाकरिता थाळेगाव(पुनर्वसन) येथील जमीन संपादित करण्यात आली. अनेकांच्या शेतात झाडे, इमारती, विहिरी, बोअरवेल आहेत. याचे कृषी विभागाकडून मूल्यांकन तातडीने करून अहवाल उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचणे आवश्यक होते. जमिनी घेवून सात महिन्यांचा कालावधी लोटूनही हा अहवाल सादर झालेला नाही. प्रत्येकवेळी या शेतकऱ्यांना आश्वासने देण्यात आली.अहवालास विलंब होत असल्याने या शेतकऱ्यांचा मोबदलाही लांबणीवर पडत आहे. आता या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या तीन दिवसात अहवाल सादर न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.पूर्वी संपादित करण्यात आलेली जमीन अपुरी पडत असल्याने या शेतकऱ्यांची वाढीव जागा घेण्यात आली. मात्र यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यापूर्वीच काम सुरू करण्यात आले. ही प्रक्रिया राबवून अतिरिक्त घेण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.दुसरीकडे या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी लांबचा फेरा करावा लागतो. रेल्वेच्या कामामुळे शेताचे दोन तुकडे पडले आहेत. उंचच्या उंच भिंती बांधल्या गेल्या. चढून जाता येत नसल्याने दूरचा फेरा करून शेतजवळ करावे लागत आहे.