शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

नेर ग्रामपंचायतीचा कर आकारणीसाठी समिती

By admin | Updated: December 9, 2015 03:03 IST

ग्रामपंचायत कर व शुल्क नियमात सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासाठी कर आकारणी समिती गठित करण्यात आली आहे.

नेर : ग्रामपंचायत कर व शुल्क नियमात सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासाठी कर आकारणी समिती गठित करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष सरपंच, तर सदस्य सचिव ग्रामसेवक राहणार आहे. उपसरपंच, जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हे या समितीत सदस्य राहणार असून ते कर व शुल्क नियमनाबाबत शिफारस करणार आहे. या संदर्भात सर्व ग्रामपंचायतींना तशा सूचना करण्यात आल्या आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात सूचना मागविण्यात आल्या आहे. यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर नोटीस लावण्याची सूचना ग्रामविकास विभागाने दिली आहे. सूचना व हरकतीवर विचार करून गठित समितीला कर व शुल्क आकारणीचे नियम १९६० यामध्ये सुधारणा करण्यासाठी नियमांचा मसुदा प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भातील हरकती व सूचना राज्य शासनाकडे पाठविल्या जाणार आहेत. यात सुधारणा होवून ग्रामपंचायतीचे शुल्क व कर आकारणीसाठीही समिती राहणार आहे. कर आकारणी समितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संनियंत्रण समितीही गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर सहायक गटविकास अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. उपविभाग अभियंता सचिव आहेत. (तालुका प्रतिनिधी)