शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बाळ अपहरणाच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:12 IST

बुधवारी पहाटे येथील ग्रामीण रुग्णालयातून नुसरत जबीन या महिलेच्या नवजात बाळाचे अपहरण केल्यानंतर रुग्णालयातील अनागोेंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

ठळक मुद्देवणी ग्रामीण रूग्णालय : दोषींवर कारवाईची टांगती तलवार, समितीत तीन डॉक्टरांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बुधवारी पहाटे येथील ग्रामीण रुग्णालयातून नुसरत जबीन या महिलेच्या नवजात बाळाचे अपहरण केल्यानंतर रुग्णालयातील अनागोेंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या गंभीर घटनेची दखल घेत या घटनेच्या चौैकशीसाठी जिल्हास्तरावर एका समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने घटनेनंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन संबंधित डॉक्टर व कर्मचाºयांची बयाणे नोंदविली.येत्या दोन दिवसांत या चौकशीचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर दोषी असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.जी.टी.धोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी असलेले डॉ.चंद्रशेखर खांबे हे वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आहेत. मात्र कुटुंबापासून दूर राहून त्यांना कर्तव्य बजावावे लागत असल्याने त्यांना येथील कामात रस नसल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून दिसून येते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे रुग्णालयात काम करणारे कर्मचारीही सैैराट झाले असून त्याचा दुष्परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. विविध घटनांनी कायम चर्चेत राहणाºया ग्रामीण रुग्णालयात बुधवारी पहाटे आक्रीतच घडले. नवजात बालकाचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने रुग्णालयीन व्यवस्थेतील निष्काळजीपणाने कळसच गाठला गेला. या घटनेने आरोग्य यंत्रणा हादरून गेली. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जी.टी.धोटे यांनी तातडीने यवतमाळ येथील डॉ.तगडपल्लीवार, डॉ.चव्हाण व डॉ.बाजोरिया यांचा समावेश असलेल्या चौैकशी समितीचे गठण केले. या समितीने वणी ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात येऊन डॉक्टर व कर्मचाºयांची बयाणे नोंदविली. चौकशी अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होणार असून त्यानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे.तीनही आरोपींकडून पोलिसांची दिशाभूलअपहरण प्रकरणात पोलीस कोठडीत असलेले आरोपी रमेश कुंभारकर, गणेश वाघमारे व श्रीकांत चुनारकर यांच्याकडून पोलिसांची दिशाभूल केली जात आहे. नेमके बाळ कुणी पळविले, याबाबत हे तिघेही एकमेकांकडे बोट दाखवित असल्याची माहिती आहे. स्थळांबाबतही वेगवेगळी माहिती त्यांच्याकडून पोलिसांना दिली जात आहे. या आरोपींना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान, पोलिसांना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, अपहरणासाठी बडावत दाम्पत्याकडून आरोपींना देण्यात आलेली ३० हजारांची अग्रीम रक्कम जप्त करावयाची आहे.अनागोंदीची तक्रार आरोग्य उपसंचालकांकडेवणीच्या ग्रामीण रूग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. त्यातच बुधवारी एका दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या कर्मचाºयांसोबतच जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.जी.टी.धोटे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. यापूर्वीदेखील या रूग्णालयात जन्मलेले बाळ विकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र ते प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोपही कांबळे यांनी केला आहे.