शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज पारेषणच्या महसुली आवश्यकतेला आयोगाची कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 13:33 IST

खासगी वीज कंपन्यांच्या सक्रियतेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीला वीज नियामक आयोगानेही धक्का दिला आहे. पारेषणची महसुली आवश्यकता निश्चित करताना आयोगाने त्याला कात्री लावली आहे.

ठळक मुद्दे १७ हजार मेगावॅट विजेचे वहनवार्षिक चार हजार कोटींचा महसूल

:राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासगी वीज कंपन्यांच्या सक्रियतेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीला वीज नियामक आयोगानेही धक्का दिला आहे. पारेषणची महसुली आवश्यकता निश्चित करताना आयोगाने त्याला कात्री लावली आहे.गेल्या काही वर्षात महापारेषणचे वीज वहन प्रत्येक वर्षी कमी होत असल्याचे आढळून येते. पर्यायाने वहनाचा प्रतियुनिट वीज दरही कमी होतो आहे. त्याचा परिणाम महसुली उत्पन्नावर झाला आहे. पारेषणने महसूल वाढीसाठी काही पर्याय दिले असले तरी आयोगाकडून त्याला जशीची तशी मंजुरी मिळत नसल्याचा पारेषणमधील सूर आहे.वीज महापारेषण कंपनीने २०१७-१८ पासून २०२०-२१ पर्यंत सरासरी १७ हजार ८०५ मेगावॅट विजेचे पारेषण केले. त्यापोटी सरासरी ३१ पैसे प्रतियुनिट दराने चार हजार कोटी रुपयांचा महसूल पारेषणला मिळाला. अंदाजे तेवढ्याच महसूल आवश्यकतेची रक्कम मंजूर केली गेली. आयोगाने २०१५-१६ पर्यंत १५.५ टक्के एवढा परतावा पारेषण कंपनीला दिला. शासनाने हा परतावा ७.५ टक्के ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र आयोगाने पारेषणच्या स्थैर्यावर परिणाम होईल असे कारण पुढे करून परतावा १५.५ टक्के एवढाच ठेवला. पारेषणची विनंती अमान्य करून २०१७-१८ पासून ते आजतागायतपर्यंत महसुली आवश्यकता निश्चित करताना परतावा ७.५ टक्केच ठेवला गेला. यावरून आयोगाने पारेषणच्या महसुली आवश्यकतेला कात्री लावल्याचे स्पष्ट होते.

महागडी वीज, सामान्यांना भुर्दंडमहसूल वाढविण्यासाठी पारेषणपुढे वीज वहन क्षमता वाढविणे, जाळे-उपकेंद्र वाढविण्याचे आव्हान आहे. कारण हाच महसुलाचा स्त्रोत आहे. खासगी कंपन्यांचे नवे प्रकल्प मार्गी लागल्यास वीज पारेषण कंपनीकडील वीज वहनाची टक्केवारी ८१ वरून आणखी कमी होण्याची शक्यता आहे. वीज खरेदी व पारेषणावर अधिक खर्च होतो म्हणून महावितरणमार्फत ग्राहकांपर्यंत जाणारी वीज आणखी महाग होते. त्याचा भुर्दंंड सामान्य ग्राहकांना बसतो.

टॅग्स :electricityवीज