सतीश येटरे यवतमाळ फोटो रिडिंग आल्यानंतर योग्य देयक येईल अशी ग्राहकांना असलेली अपेक्षा अवघ्या काही दिवसातच फसवी ठरली. फोटो रिडिंगच आता वीज ग्राहकांना मनस्ताप देत असून, अव्वाच्या सव्वा देयक, त्यातही थकित युनीटने ग्राहकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. अभियंत्यांच्या कमिशनखोरीत कंत्राटदारांचे चांगभलं होत असून दुसरीकडे ग्राहकांची मात्र टोलवाटोलवी सुरू आहे. ग्राहकांच्या रोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेक अभियंते चक्क कार्यालयाला दांडी मारत आहे. पूर्वी वीज वितरण कंपनीचीच मिटर रिडिंग घेणारी यंत्रणा होती. त्यासाठी मिटर वाचक नेमण्यात आले होते. मात्र कालांतराने ही पदे गोठविण्यात आली. नवीन प्रणाली आत्मसात करीत फोटो रिडिंग घेण्याचा प्रकार पुढे आला. २०१२-१३ या आर्थिक वर्षात रेन्बो कंपनीला जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या १८ ही उपविभागात फोटो रिडिंग आणि देयक वितरणाचे काम दिले. मात्र या कंपनीने कर्तव्य निट बजावले नाही म्हणून काम थांबविण्यात आले. असे आहेत कंत्राटदारांना दिले जाणारे दरशहरी भागात मिटर रिडिंगच्या एका फोटोसाठी तीन रुपये ५० पैसे, डाटा पंचिंग ५० पैसे आणि देयक वितरण यासाठी एक रुपया असे एकूण पाच रुपये कंत्राटदाराला मिळतात. तर ग्रामीण भागात एका फोटोसाठी चार रुपये ५० पैसे, डाटा पंचिंग ५० पैसे आणि बील वितरणासाठी एक रुपया ५० पैसे असे एकूण सहा रुपये ५० पैसे कंत्राटदारांना मिळतात. तरीही ही अनागोंदी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व्हरमधील बिघाडाचाही मनस्तापवीज देयक दुरूस्तीसाठी शेकडो ग्राहक वीज वितरणच्या कार्यालयात धडकतात. त्यांच्याकडून देयके दुरूस्तीसाठी घेतली जातात. दोन दिवसांनी येण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात मात्र दोन दिवसात हे काम होतच नाही. मुंबईतून आॅपरेट होणाऱ्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगून सात ते आठ दिवस ग्राहकाला पायपीट करायला लावली जाते. त्यामुळे कमालीचा मनस्ताप होत आहे.
कमिशनने वीज ग्राहक वेठीस
By admin | Updated: February 18, 2015 02:15 IST