शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

६४ शाळांचे अनुदान आयुक्तांनी हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:01 IST

जिल्हा आणि संचालक स्तरावरून मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या ६४ उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी आयुक्तांपर्यंत पोहोचली होती. मात्र, आयुक्त कार्यालयात गैरव्यवहार होऊन या ६४ शाळा जाणीवपूर्वक यादीतून वगळण्यात आल्या, असा खळबळजनक आरोप सोमवारी जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी केला.

ठळक मुद्देशिक्षकांचा आरोप : मूल्यांकन यादीतील अन्यायाविरुद्ध यवतमाळात आंदोलन

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा आणि संचालक स्तरावरून मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या ६४ उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी आयुक्तांपर्यंत पोहोचली होती. मात्र, आयुक्त कार्यालयात गैरव्यवहार होऊन या ६४ शाळा जाणीवपूर्वक यादीतून वगळण्यात आल्या, असा खळबळजनक आरोप सोमवारी जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी केला.महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत शिक्षकांनी आपल्या व्यथा मांडल्या. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षक गेल्या १७ वर्षांपासून विनावेतन काम करीत आहे. जिल्ह्यात १७५ विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा आहेत. त्यातील ६४ मूल्यांकन पात्र शाळांची यादी शिक्षणाधिकारी स्तरावरून उपसंचालक आणि पुण्याच्या शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आली. तीच यादी शिक्षण आयुक्तांकडे गेली होती. परंतु, आयुक्तांनी शासनाकडे पात्र शाळांची यादी पाठविताना या ६४ पैकी एकाही शाळेचा समावेश केला नाही. त्यामुळे शिक्षकांच्या संतापाचा भडका उडाला आहे.आता शासनाने शिक्षण संचालकांकडील सर्व मूल्यांकन पात्र प्रस्ताव मागवून सर्व पात्र शाळांची यादी त्वरित घोषित करण्यात यावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे. त्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे पाठविण्यात आली. आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम येरेकार, सचिव प्रा. संदीप विरुटकर, उपाध्यक्ष प्रा. आनंद चौधरी, संघटक प्रा. उमाशंकर सावळकर, प्रा. आकाश पायताडे, प्रा. एल. एस. पायलवार, प्रा. संगीता येणूरकर, मुख्याध्यापक संघाचे सचिव भूमन्ना बोमकंटीवार यांनी आयुक्त स्तरावरच घोळ झाल्याचा आरोप केला. आंदोलनात प्रा. श्रीकांत लाकडे, प्रा. किशोर अग्गुलवार, प्रा. नंदकिशोर पवार, प्रा. महेंद्र वाडेकर, प्रा. राजेश येरावार, प्रा. विजय नगराळे, प्रा. अभय जगताप, प्रा. प्रवीण दरणे, प्रा. संजय डुकरे, प्रा. दिलीप मांडवकर आदी उपस्थित होते.पेपर तपासणीवर बहिष्कार कायममूल्यांकन पात्र यादीत यवतमाळ जिल्ह्यातील शाळांवर झालेला अन्याय जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम राहणार असल्याची भूमिका पत्रकार परिषदेत शिक्षकांनी स्पष्ट केली. मुंबईत येथील आंदोलनात ‘विजुक्टा’ने बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतलेला नाही, असे यावेळी सांगण्यात आले.