शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्हा मध्यवर्ती बँकेत रंगतोय पत्त्यांचा डाव

By admin | Updated: December 2, 2015 02:32 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थानिक पाचकंदील चौक स्थित मुख्यालयात रात्री उशिरापर्यंत पत्त्यांचा डाव रंगतो.

नियंत्रण ठेवणारेच सहभागी : आलिशान वाहने ठरताहेत पुरावा यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थानिक पाचकंदील चौक स्थित मुख्यालयात रात्री उशिरापर्यंत पत्त्यांचा डाव रंगतो. सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी बैठकीनंतर हा डाव रंगला आणि यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात चर्चेला पेव फुटले. जिल्हा बँकेत चालणाऱ्या गैरकारभाराच्या चर्चा आता बँकेच्या परिसरातील कॅन्टींग, हॉटेल व पानटपऱ्यांवरही रंगू लागल्या आहेत. या चर्चा आता शेजारीच असलेल्या शहर ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहोचल्या आहेत. साहित्य खरेदीतील घोटाळे, बांधकामातील विलंब, कर्ज वाटपातील घोळ, बँक कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसमधील मार्जीन, खानपानावर बँकेच्या पैशातून होणारी उधळपट्टी, बँकेसाठी कागदोपत्री धावणारी संचालकांची वाहने, मात्र दरमहा न चूकता तत्काळ निघणारी त्यांची देयके असे विविध विषय बँकेसमोर नेहमीच चर्चिले जातात. त्यात आता बँकेत रंगणाऱ्या पत्त्याच्या डावाचीही भर पडली आहे. बँकेच्या परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आता पत्त्याचे डावही रंगू लागले आहेत. या पत्त्यांसोबत हिरव्या नोटांचीही देवाण-घेवाण होते. कधीकाळी बँकेतील अ‍ॅन्टी चेंबरमध्ये रंगणारा हा डाव मध्यंतरी बँकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धान्य बाजार परिसरात शिप्ट झाला होता. मात्र मध्यंतरी उत्सवातील गर्दीमुळे हा डाव पुन्हा बँकेत सुरू झाला. आता तर चक्क नेहमी बैठक होणाऱ्या ठिकाणीच हा डाव खेळला जात असल्याचे चर्चिले जाते. या डावाचा पुरावा म्हणून बँकेसमोर रात्री उशिरापर्यंत उभ्या राहणाऱ्या आलिशान वाहनांकडे बोट दाखविले जाते. सोमवारी जिल्हा बँकेत बैठक होती. त्यानंतर सर्व कर्मचारी घरी गेले, बँक बंद झाली. मात्र ज्यांनी बँकेवर नियंत्रण ठेवायचे त्यातील काही जण बँकेतच तळ ठोकून होते. अंधार पडताच त्यांनी पत्त्याचा डाव सुरू केला. रात्री उशिरापर्यंत हा डाव चालला. बँकेच्या सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षा रक्षक असल्याने आणि प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले असल्याने बाहेरील सुरक्षा यंत्रणेने या डावावर वक्रदृष्टी फिरविण्याचा धोका नसतोच. त्यामुळे डाव रंगविणारे अगदी बिनधास्त हिरव्या नोटा उधळत असतात. खेळणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठीत असतात. त्यांचा खेळ मोडल्यास राजकीय दबाव येण्याची भीती पोलिसांना असावी म्हणूनच शहर पोलीस कानाशेजारी असूनही पत्त्यांच्या या डावाकडे कानाडोळा करतात. अनेकदा हा डाव रंगात आला की, सामिश भोजनाचे डबेही तेथेच बोलविले जातात. खानपानही जागीच मिळाल्याने या डावात आणखी रंगत भरते. शेतकऱ्यांच्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शेतकरी सभासदांनी आपल्याच काही सुशिक्षित निवडक बांधवांवर दिली. मात्र यातील काही बांधव स्वत:च बँकेची व पर्यायाने जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची इभ्रत वेशीवर टांगायला निघाले असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून बँकेत हा डाव रंगतो आहे. एकदा पोलिसांना याची टीप मिळाल्याने धाड घालण्याची व्यूहरचना केली गेली होती. परंतु तत्कालीन एक बडा अधिकारी फितूर झाला, त्याने जातीसाठी माती खाल्ली आणि पोलिसांना हा डाव रंगेहात पकडण्यापासून मुकावे लागले. त्यानंतर परत कुणी हा डाव पकडण्याची तसदी घेतली नाही. पोलीस ठाण्याच्या भिंती शेजारी पत्त्याचा हा डाव खेळला जात असूनही पोलीस कारवाई करीत नाही.