शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध

By admin | Updated: August 12, 2016 02:09 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे

जिल्हा परिषद : स्थायी समितीच्या बैठकीत उपाध्यक्षांना ‘प्रभारा’तून डावलल्याचे राजकारण यवतमाळ : जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँगे्रस आघाडीची सत्ता आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना, भाजप, मनसे, अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. परिणामी काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील दरी रूंदावत गेली. मात्र दोन वर्षांपूर्वी या दोन्ही पक्षातील धुरीणांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी भावी काळातील धोके ओळखून एकत्रित येण्याचे निश्चित केले. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली. या आघाडीने सत्ता स्थापन केली. ठरल्यानुसार ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद काँग्रेसच्या नशीबी आले. मात्र गेली दोन वर्षे या दोन्ही पक्षात सतत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि काही सदस्य काँग्रेसला जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सभापती मात्र सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कसरत करीत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असूनही त्यांच्यात वर्चस्वाची छुपी लढाई सुरू आहे. प्रशासनावर आपलाच वचक राहावा, यासाठी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे. यातूनच त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. आत्तापर्यंत पडद्याआड सुरू असलेले हे युद्ध आता उघड झाले आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सतत प्रशासनावर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यातून काँग्रेसमध्ये प्रचंड खदखद सुरू आहे. तथापि काँग्रेसचे काही वजनदार सदस्य मात्र आपला कार्यभाग साधून घेण्यात माहीर असल्याने त्यांना या शीतयुद्धात कोणतेही स्वारस्य नाही. आपले काम उरकून घेण्यासाठी ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशीही गोडीगुलाबीने वागत आहे. (शहर प्रतिनिधी) सभापतीला सुत्रे देण्यामागील रहस्य गुलदस्त्यात स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतात. मात्र त्यांच्या रजा कालावधीत, गैरहजेरीत अथवा अनुपस्थितीत उपाध्यक्ष अध्यक्षपद भूषवितात. राजकारणात तसे संकेत आहे. मात्र बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आक्रीत घडले. अध्यक्ष बैठकीला उपस्थित नसताना आणि उपाध्यक्ष उपस्थित असतानाही, चक्क बांधकाम समिती सभापतींनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. वास्तविक अध्यक्ष नसल्याने उपाध्यक्षांचा तो हक्क होता. तथापि उपाध्यक्ष काँग्रेसचे असल्याने जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी आपला प्रभार आपल्याच पक्षाच्या सभापतींकडे सोपविला, हे स्पष्ट झाले. त्यामुळे या बैठकीत या दोन्ही पक्षातील सुदोपसुंदी उघड झाली आहे.