शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांचा रूबाब वाढविणारा कोट इतिहासजमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

हा ड्रेस वापरताना क्राॅस बेल्ट, स्कार्प अशा वस्तूंचा पेहरावामध्ये समावेश करण्यात आलेला होता. मानवंदना देताना आणि कवायत करताना हा ड्रेस वापरला जात होता. महासंचालक अथवा कुठली मोठी व्यक्ती आली तर हा ड्रेस परिधान करून त्याला मानवंदना दिली जात होती. यामुळे पोलीस खात्याची गरिमा आणखीनच उंचावली जात होती. मात्र हा पोशाख अनेकांना अवघड वाटत होता. त्याच्या वापरासाठी मोठा खर्च होत होता.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पोलिसांचा सर्वाधिक रुबाबदार ड्रेस म्हणून ओळखला जाणारा ट्युनिक ड्रेस आता इतिहासजमा होणार आहे. पोलीस महासंचालकांनी यासंदर्भातील आदेश काढले आहे. पीएसआय ते डीवायएसपीपर्यंत या ड्रेसवर बंदी घालण्यात आली आहे. त्या जागेवर खाकी ड्रेस वापरावा लागणार आहे. हा ड्रेस वापरताना क्राॅस बेल्ट, स्कार्प अशा वस्तूंचा पेहरावामध्ये समावेश करण्यात आलेला होता. मानवंदना देताना आणि कवायत करताना हा ड्रेस वापरला जात होता. महासंचालक अथवा कुठली मोठी व्यक्ती आली तर हा ड्रेस परिधान करून त्याला मानवंदना दिली जात होती. यामुळे पोलीस खात्याची गरिमा आणखीनच उंचावली जात होती. मात्र हा पोशाख अनेकांना अवघड वाटत होता. त्याच्या वापरासाठी मोठा खर्च होत होता. आता खाकी ड्रेस आल्याने या खर्चाला ब्रेक लागणार आहे. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उपअधीक्षकापर्यंत अंमलबजावणीपोलीस महासंचालकांना पोलीस उपनिरीक्षक ते उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यापर्यंत ट्युनिक ड्रेस कोड बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या प्रवर्गातील अधिकारी खाकी ड्रेसवर कामकाज पार पाडावे लागणार आहे. यावरील पदाकरिता ट्युनिक ड्रेस वापरता येणार आहे.

वापर होता गैरसोयीचा

डिसेंबर ते जानेवारी महिन्यात हा ट्युनिक ड्रेस वापरला जात होता. कवायत आणि मानवंदनेसाठी या ड्रेसचा वापर होत होता. या ड्रेसचा खर्च गणवेश भत्त्यापेक्षा अधिक होता. मानवंदना देताना तलवारीची सलामी करताना हा ड्रेस अनेकांना अडसर ठरत होता. यामुळे नियमित गणवेश सोप्या पद्धतीने वापरता येणार आहे.

भत्ता १२५० रुपये, खर्च १० हजारपोलिसांना ट्युनिक ड्रेससाठी केवळ १२५० रुपयाचा भत्ता मिळतो. त्या तुलनेत १० हजार रुपयाचा खर्च त्यांना करावा लागतो. आता हा भुर्दंड पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना कमी करता येणार आहे.

यावेळी करावा लागायचा परिधानब्रिटिश काळापासून हा ड्रेस चालत आलेला आहे. थंडीच्या दिवसात या पोशाखाचा वापर होत होता. एसपी अथवा डीआयजी आले तर किंवा कवायत आणि मानवंदनेसाठी ट्युनिक ड्रेस वापरला जात होता.

खाकी ड्रेस वापरावा लागेलपीएसआय ते डीवायएसपीपर्यंत ट्युनिक ड्रेस वापरला जात होता. त्यावर आता बंदी आली आहे. त्या जागेवर खाकी ड्रेस वापरावा लागणार आहे. डीवायएसपीच्या पुढे मात्र अशा स्वरूपाचे बंधन नाही.  - दिलीप पाटील भुजबळ,पोलीस अधीक्षक, यवतमाळ 

निवृत्त पोलीस अधिकारी म्हणतात...

हा एक सन्मानजनक ड्रेस होता. यामुळे पोलिसांची गरिमा अधिक उठून दिसत होती. ब्रिटिश काळापासून आलेला हा पोषाख सुंदर पोषाख होता. मात्र अलीकडील घेण्यात आलेला निर्णय योग्य नाही.- गिरीश बोबडे, निवृत्त डीवायएसपी 

हा पोषाख त्रासदायक होता. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश काळापासून हा पोषाख वापरला जात होता. पोलीस विभागात घेण्यात आला हा निर्णय योग्य आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळेल. - विलास वांदिले, निवृत्त डीवायएसपी

 

टॅग्स :Policeपोलिस