शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या लुटीत कुणाचे हात काळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगतच्या पैनगंगा खाणीतून शस्त्राच्या धाकावर कोळशाची लूट करण्यात आल्याच्या प्रकरणाचे तार वणीशी ...

ठळक मुद्देपैनगंगातील चोरी प्रकरण : चंद्रपूर पोलिसांच्या वणीत येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगतच्या पैनगंगा खाणीतून शस्त्राच्या धाकावर कोळशाची लूट करण्यात आल्याच्या प्रकरणाचे तार वणीशी जुळले असून संबंधित कोळसा खरेदी करणाऱ्या व्यापाºयाच्या शोधात चंद्रपूर पोलीस वणीत येरझारा घालत आहेत. अद्याप सदर व्यापारी पोलिसांच्या हाती लागला नसून या लुटीत वणीतील आणखी काही व्यापाºयांचा हात आहे का, हेदेखील पोलीस यंत्रणेकडून चाचपून पाहिले जात आहे.पैनगंगा कोळसा खाणीतून कोळसा चोरायचा आणि तो थेट वणी येथील लालपुलिया भागात आणून विकायचा, असे सत्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोळशाच्या या काळ्या धंद्यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या साºया प्रकरणात वेकोलिचे कर्मचारीदेखील सहभागी असल्याची बाब पोलीस चौकशीत उघड झाली आहे.पैनगंगा कोळसा खाणीत शस्त्राच्या धाकावर कोळसा लुटून नेल्याच्या घटनेनंतर या चोरीचे तार वणीत असल्याची कुणकुण लागताच, चंद्रपूर पोलिसांचे एक पथक मागील आठवडाभरापासून वणी येथे चौकशीसाठी फेºया मारत आहे.येथून पोलिसांनी काही लोकांना अटकही केली आहे. या प्रकरणात वणीतील आणखी काही व्यापाºयांचा सहभाग आहे का, याचीदेखील पोलीस चौकशी करीत आहे. चोरलेला कोळसा कोण खरेदी करीत होता. खरेदी केलेला हा कोळशाची नंतर कोणत्या व्यापाºयाच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जायची, हा पोलिसांच्या चौकशीचा भाग ठरला आहे.दरम्यान, चोरीचा कोळसा खरेदी करणाºया व्यापाºयाचे नाव उघड झाले असून त्याला अटक करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांचे पथक वणी परिसरात फिरत आहे. मात्र सध्या सदर व्यापारी वणीतून भूमिगत झाल्याची चर्चा असून त्यामुळे चंद्रपूर पोलिसांना आल्यापावली परत जावे लागत आहे. सदर व्यापाºयाचे ‘लोकेशन’ शोधण्याचे काम सध्या पोलीस यंत्रणा करीत आहे.वणी तालुक्यातून पोलिसांनी सहाजणांना उचललेगडचांदूर येथील पैनगंगा कोळसा खाणीतून शस्त्राच्या धाकावर कोळसा लुटून नेल्याप्रकरणीत चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंत वणी तालुक्यातून सहाजणांना अटक केली आहे. अरुण मुरलीधर कणसे (रा.कैलासनगर), राकेश तेजराम बोधनकर (रा.कैलासनगर), संजय पांडुरंग भुसारी (रा.राजूर), गजानन कुत्तरमारे (रा.निंबाळा), राकेश मस्की (रा.झरपट), अनंता तुकाराम मस्की (रा.झरपट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.