शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वणी क्षेत्रातील कोळसा खाणींना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:57 IST

कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने वणी क्षेत्रातील अनेक कोळसा खाणींना अखेरची घरघर लागली आहे. वणी उत्तर क्षेत्रातील सात कोळसा खाणींपैैकी चार कोळसा खाणी बंद पडल्या असून एक कोळसा खाण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी वेकोलिने कामगारांच्या सोईसुविधांमध्ये कपात करणे सुरू केल्यामुळे कामगार तणावात आले आहेत.

ठळक मुद्देसुविधांच्या कपातीने कामगार तणावाखाली : सर्वाधिक उत्पन्न देणारी उकणी खाण ‘कोमात’

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने वणी क्षेत्रातील अनेक कोळसा खाणींना अखेरची घरघर लागली आहे. वणी उत्तर क्षेत्रातील सात कोळसा खाणींपैैकी चार कोळसा खाणी बंद पडल्या असून एक कोळसा खाण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी वेकोलिने कामगारांच्या सोईसुविधांमध्ये कपात करणे सुरू केल्यामुळे कामगार तणावात आले आहेत.काळ्या हिऱ्यांची खाण म्हणून वणी क्षेत्रातील कोळसा खाणींकडे पाहिले जात होते. परंतु अलिकडे काही वर्षांत कोळसा खाणीतील उत्पन्न घटल्याने पिंपळगाव, कुंभारखणी, कोलारपिंपरी व घोन्सा या चार कोळसा खाणी बंद करण्यात आल्या असून भांदेवाडा ही भूमिगत कोळसा खाण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. बंद पडलेल्या कोळसा खाणीतील कामगारांपैकी काहींना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वेकोलि क्षेत्रात पाठविण्यात आले, तर काहींना परप्रांतात रवाना करण्यात आले. यामुळे या कामगारांचे कुटंूब विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक उत्पन्न देणारी उकणी कोळसा खाणदेखील कोमात जाण्याच्या स्थितीत आहे. कोळसा खोल गेल्याने उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, ते वेकोलिला पेलवत नसल्याने नजिकच्या काळात या कोळसा खाणीवरदेखील बंद होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.वणी तालुक्यातील घोन्सा येथील कोळसा खाण गेल्या तीन वर्षापासून बंदावस्थेत आहे. मध्यंतरी ही कोळसा खाण एका खाजगी कंत्राटदाराला चालविण्यासाठी देण्यात आली होती. मात्र या भाग खडकाळ असल्याने सदर कंत्राटदाराने खाणीचे काम सोडले. आता स्वत: वेकोलिच ही खाण सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. बंद असलेल्या कोळसा खाणीतील १३० कामगारांना घोन्सा कोळसा खाणीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उकणी, जुनाडा या कोळसा खाणीतील यंत्र घोन्सा कोळसा खाणीत हलविणे सुरू झाले आहे. या कोळसा खाणीला वार्षिक सहा लाख टन कोळसा उत्पादन करण्याचे लक्ष्य देण्यात आल्याचे वेकोलितील सूत्रांनी सांगितले. लवकरच ही खाण सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.