शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

कोचिंग क्लासेस फुल्ल...कॉलेज मात्र नावालाच

By admin | Updated: July 3, 2016 02:31 IST

शहरातील गल्लीबोळात कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करून लाखोचा उपयोग सध्या सुरू आहे.

शिक्षणाचे बाजारीकरण : गुणवंत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे केले जाते भांडवल, पालक अगतिक पुसद : शहरातील गल्लीबोळात कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करून लाखोचा उपयोग सध्या सुरू आहे. नावाजलेल्या क्लासमध्ये पाल्यांचा प्रवेश हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे पाल्याची नाव किनाऱ्यावर लागली, अशीच अनेकांची धारणा आहे. त्यामुळेच आज कॉलेजपेक्षाही क्लासेसची ‘किंमत’ वाढली असून, कॉलेज फक्त नाममात्र उरले आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे बाजारीकरण झपाट्याने होत आहे. दहावी, बारावीचे निकाल लागणे आणि शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशाबरोबरच क्लासेसच्या प्रवेशांची धांदल उडाली. शहरातील क्लासेसनी तर विद्यार्थ्यांच्या टक्केवारीनुसार रेकॉर्डच बनवले आहेत. अकरावी, बारावी सायन्स व सीईटीसाठी ४० हजारांपासून एक लाखांपर्यंत फी आकारली जात आहे. काही क्लासेसने विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी केवळ अकरावी किंवा बारावीच्या वर्गापुरता प्रवेश घेतला तर सीईटीसाठीही प्रवेश बंद राहणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजाने पाल्यांना अकरावी, बारावीसह सीईटी, असे एकत्रित पॅकेज घ्यावे लागत असून, फीदेखील एकत्रित दिल्याचे अनेकांनी सांगितले. या क्लासेसच्या वाढत्या फॅडमुळे क्लासेसमध्ये विद्यार्थी मावेनात अन् कॉलेजला विद्यार्थी मिळेना, अशी स्थिती झाली आहे. काही महाविद्यालये व क्लासेसमध्ये साटेलोटे केले जात असून, क्लासचालक सांगतील त्याच कॉलेजात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरला गेला आहे. विशेष म्हणजे, अमूक ठिकाणी प्रवेश घेतल्यास हजेरी लावण्यासाठी विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही सांगण्यात येते. यामध्ये पालकांना क्लासची फी व कॉलेजचे डोनेशन, असा दुहेरी बोजा सोसावा लागत आहे. खासगी क्लासेसच्या संदर्भात कोणतीही अधिकृत नोंदणी पद्धत नाही. शॉप अ‍ॅक्टचा परतावा आवश्यक असताना पुसदमधील एकाही क्लासचालकाने हा परवाना काढलेला नाही. केवळ ज्याला वाटेल तो आपल्या नावाचा बोर्ड लावून व पॉम्पलेट वाटून आपला खासगी क्लास सुरू करीत आहे. एकदा क्लास सुरू झाला की शिक्षण विभागही त्यावर प्रभावी नियंत्रण ठेऊ शकत नसल्यामुळे खासगी क्लासेसचे पेव संपूर्ण जिल्ह्याभरात फुटले आहे. पुसद शहरात गल्ली-गल्लीत कोचिंग क्लासेस सुरू झाले आहेत. शाळा, महाविद्यालयात अध्यापन कार्य करणारे शिक्षकसुद्धा कोचिंग क्लास चालवित आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. क्लासेसची फी ही सर्वसामान्यांच्या आटोक्यात नाही. ‘पैसा फेको तमाशा देखो’ असाच काहीसा प्रकार कोचिंग क्लासेसमध्ये पाहावयास मिळतो, हे तितकेच खरे. (तालुका प्रतिनिधी)