शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड येथे अवैध सावकाराच्या घर-दुकानावर सहकारची धाड

By admin | Updated: July 13, 2017 00:11 IST

अवैध सावकारी प्रकरणी येथील एका सावकाराच्या घरासह दुकानावर सहकार विभागाच्या पथकाने बुधवारी

आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त : धनादेशाच्या अनादरानंतर तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : अवैध सावकारी प्रकरणी येथील एका सावकाराच्या घरासह दुकानावर सहकार विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी हनुमान वॉर्ड आणि गोचरस्वामी वॉर्डात धाड मारली. यावेळी २६ प्रकारचे आक्षेपार्ह कागदपत्रे आणि नोंदीच्या वह्या जप्त करण्यात आल्या. गोविंद सोमानी असे धाड टाकण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. तो उधारीवर दिलेल्या पैशाच्या बदल्यात संबंधितांकडून कोरे धनादेश घेत होता. पैसे दिले नाही तर अवास्तव रक्कम टाकून धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकत होता. धनादेश अनादरीत झाला तर न्यायालयात दाद मागून संबंधिताला त्रास देत होता. या प्रकरामुळे त्रस्त झालेल्या के.के. झेरॉक्सचे मालक सतीश कदम यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. कदम यांनी सोमानी यांच्याकडून सहा हजार रुपये उसणवार घेतले होते. त्याबदल्यात पाच कोरे धनादेश घेण्यात आले. त्यावर दोन लाख ७५ हजार रुपये लिहून तो बँकेत वटविण्यासाठी टाकण्यात आला. धनादेश अनादरीत झाल्याने सावकाराने प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तसेच मानसिक त्रास देणे सुरू केले. या प्रकाराची तक्रार प्राप्त होताच सहाय्यक निबंधक सुनील भालेराव, ए.डी. भागानगरे, एस.एस. पिंपळखेडे, ओ.एम. पहुरकर, पोलीस निरीक्षक एस.पी. उन्हाळे, ए.आर. पौळ, के.एस. कोरे यांनी हनुमान नगरातील सोमानी यांच्या घरी आणि गोचरस्वामी वॉर्डातील दुकानावर धाड मारली. त्या ठिकाणाहून नोंदीच्या वह्या आणि २६ प्रकारची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले.