शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

जिल्हा बँक संचालकांच्या चौकशीला अखेर सहकार मंत्र्यांचा स्थगनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

जिल्हा बँकेच्या एकूणच कारभाराबाबत यवतमाळातील दोघांनी विभागीय सहनिबंधक अमरावती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यात जिल्हा बँक संचालकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. त्यानुसार सहनिबंधकांनी कलम ८३ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. पुसदचे सहायक निबंधक सुनील भालेराव यांच्याकडे ही चौकशी सोपविली गेली.

ठळक मुद्देकलम ८३ : विभागीय सहनिबंधक, २४ नोव्हेंबरला पुढील सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी (सहकारी संस्था) सुरू केलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ चौकशीस सहकारमंत्र्यांनी ३० सप्टेंबर रोजी ंंअंतरिम स्थगनादेश दिला आहे.जिल्हा बँकेच्या एकूणच कारभाराबाबत यवतमाळातील दोघांनी विभागीय सहनिबंधक अमरावती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यात जिल्हा बँक संचालकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. त्यानुसार सहनिबंधकांनी कलम ८३ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. पुसदचे सहायक निबंधक सुनील भालेराव यांच्याकडे ही चौकशी सोपविली गेली. मात्र सहनिबंधकांच्या या चौकशीच्या आदेशाला चौघांनी अ‍ॅड. एस.व्ही. पारखी यांच्यामार्फत सहकारमंत्र्यांकडे आव्हान दिले. ३० सप्टेंबर रोजी या प्रकरणात समक्ष सुनावणी झाली. सुनावणीअंती या चौकशीला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देत असल्याचा आदेश मंत्र्यांच्यावतीने अवर सचिवांनी जारी केला. याप्रकरणात पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ आहे. साहित्य खरेदी, वाहने यावर अव्वाच्या सव्वा खर्च होतो आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळेच हा घोळ खणून काढण्यासाठी चौकशीची मागणी केली गेली होती. ही चौकशी सुरू होत असतानाच मंत्र्यांनी त्याला स्थगनादेश दिला. हा स्थगनादेश मिळविण्यासाठी याचिकाकर्त्यांनी मुंबईवारीही केली.संचालकांच्या शिफारसींवरील कर्जे थकीतबँकेतील विविध आर्थिक घोळांसोबतच गेल्या १३ वर्षात संचालकांच्या शिफारसींवरून मंजूर झालेली कर्ज प्रकरणेही वांद्यात सापडली आहेत. हे कर्ज थकीत झाले आहे. या कर्जासाठी संचालकांनी मौखिक हमी घेतली होती. स्वत: कर्ज घेतल्यास निवडणुकीत अपात्र होऊ या भीतीने काही संचालकांनी नातेवाईक, मित्र, कार्यकर्ते, गावशेजारी यांच्या नावाने ही कर्जे उचलून स्वत:च त्याचा वापर केल्याचेही बोलले जाते.

टॅग्स :bankबँक