बाभूळगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार ६ मे रोजी बाभूळगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून ते तालुक्यातील डेहणी उपसा जलसिंचन प्रकल्पाला भेट देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपसा जलसिंचन प्रकल्पासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून नागरिकांनाही मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी डेहणी गावालगत हेलिपॅडची व्यवस्था करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री शनिवारी डेहणी प्रकल्पावर
By admin | Updated: May 2, 2017 00:04 IST