शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात नाफेडची तूर खरेदी बंद

By admin | Updated: March 3, 2017 02:04 IST

मागीलवर्षी तुरीची डाळ २०० रूपयांवर गेली. म्हणून यंदा शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळला.

बारदाणा संपला : आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचा केंद्रावर मुक्काममारेगाव : मागीलवर्षी तुरीची डाळ २०० रूपयांवर गेली. म्हणून यंदा शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळला. पण भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत नाफेड खरेदी सुरू करण्यात आली. परंतु आठ दिवसांपासून बारदाणा नसल्याचे कारण देत नाफेडने खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पडून आहे. हीच संधी साधत व्यापाऱ्याने तुरीचे भाव पाडले असून १० हजारांची तूर खासगीमध्ये साडेतीन हजार रूपयात खरेदी करीत आहे.गेल्या वर्षी तुरीचे दर १२ हजार रूपयांच्यावर गेले होते. कापूस, सोयाबीनचे दर गेल्यावर्षी कोसळल्याने तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात तुरीकडे वळला. पावसाने साथ दिल्याने उत्पादनही समाधानकारक मिळाले. परंतु यावर्षी भाव कोसळल्याने शासनाने हमी भावाने नोफडमार्फत खरेदी सुरू केली. आधारभूत किंमत चार हजार ६२५ रूपये व ४२५ रूपये बोनस असा पाच हजार ५० रूपयांचा भाव ठरविण्यात आला. खुल्या बाजारात मात्र केवळ साडेतीन हजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर गर्दी केली. येथील बाजार समितीमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र आहे. परंतु आठ दिवस या केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर आता बारदाणा संपला म्हणून २३ फेब्रुवारीपासून हे केंद्र बंद आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात असलेली तूर खुल्या बाजारात तुरीचे अल्प दर आणि नाफेड खरेदी बंद होण्याची भिती, यामुळे शेतकरी बैलगाड्या व इतर वाहने घेऊन आठ दिवसांपासून ३९ शेतकरी बाजार समितीच्या यार्डामध्येच मुक्कामी आहेत. आठ दिवसांपासून बारदाण येणार, असे सांगत असले तरी बारदाणा फारच अल्प येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे केंद्रावर गोंधळ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)