शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोठा येथील दारूचे दुकान बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:46 IST

तालुक्यातील कोठा (वेणी) येथील देशी दारूचे दुकान कायमस्वरुपी बंद करावे, यासाठी परिसरातील हजारो महिलांनी सनदशीर मार्गाने अनेकदा आंदोलने केलीत.

ठळक मुद्देमहिलांची धडक : कोठा येथून वीस गावांना होतोय दारूचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील कोठा (वेणी) येथील देशी दारूचे दुकान कायमस्वरुपी बंद करावे, यासाठी परिसरातील हजारो महिलांनी सनदशीर मार्गाने अनेकदा आंदोलने केलीत. हजारोंच्या संख्येने महिलांनी ठिय्या आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले. परंतु प्रशासन जागे झाले नाहीत. त्यामुळे नवनियुक्त जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना महिलांनी निवेदन देत दारूचे दुकान कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी कळंब तालुक्यातील महिलांनी लाऊन धरली.गावच्या मध्यभागी दारूचे दुकान असल्यामुळे दारू पिणाºयांची संख्या वाढली आहे. शाळकरी मुलेही दारूच्या आहारी गेले आहे. याचे नरकयातनामय दुष्परिणाम महिला आणि कुंटुबाला भोगावे लागत आहे. या दुकानातून आजूबाजूच्या २० गावांना दारूचा पुरवठा केला जातो. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन या गोष्टींकडे आर्थीक देवाणघेवाणीतून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या महिलांचा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन दारूच्या जाचातून गावकरी व परिसरातील नागरिकांची मुक्तता करण्यासाठी दारूचे दुकान बंद करावे, अशी मागणी केली आहे.येत्या पाच दिवसात दारूचे दुकान बंद न केल्यास हा लढा अधीक तीव्र करण्यासाठी महिला आमरण उपोषण करतील, असा इशारा स्वामीनी दारुबंदीच्या तालुका संयोजक मनिषा काटे, मंगला आत्राम, सुशिला चाकले, इंदिरा रोहनकर, प्रणिता नागतोडे, गीता जहानपुरे, शकुना सहस्त्रबुद्धे, लक्ष्मी सहस्त्रबुद्धे, तुळसा मसराम, निर्मला ठाकरे, रंजना खसाळे, वनिता गाडगे, रेखा भगत आदी महिलांनी दिला आहे.