शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दारू, मटका, जुगार तत्काळ बंद करा

By admin | Updated: June 29, 2017 00:09 IST

जिल्ह्यात दारू, मटका, जुगार खुलेआम सुरू असून तो तत्काळ बंद करावा, ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि या व्यवसायांना

पोलिसांना निर्देश : ठाणेदारांवर कारवाईची सूचना लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात दारू, मटका, जुगार खुलेआम सुरू असून तो तत्काळ बंद करावा, ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि या व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या ठाणेदारांना निलंबित करावे, असे निर्देश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत देण्यात आले. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचाही आढावा घेतला गेला. एसपींचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला तिवारी यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही अवैध व्यवसायांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तिवारी म्हणाले, जिल्ह्यात वरली, मटका, जुगार सर्वत्र सुरू आहे. पोलीस हे अवैध धंदे बंद असल्याचा दावा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. ठिकठिकाणी गावठी दारूची निर्मिती, विक्री व वाहतूक सुरू आहे. असे असतानाही पोलिसांनी धाडी घालून मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे ऐकिवात नाही. शहरी व ग्रामीण नागरिकांचा दारू, मटका, जुगारला प्रचंड विरोध असतानाही जनतेच्या नाकावर टिच्चून अप्रत्यक्ष पोलीस संरक्षणात हे धंदे चालविले जात आहे. या अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या ठाणेदारांना तत्काळ निलंबित करा, वरिष्ठांचे ऐकले जात नसेल तर आम्ही वरिष्ठांवर कारवाईची मागणी करू, अशी भूमिका आपण बैठकीत मांडल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. यवतमाळ : जिल्ह्यात दमदार पावसाची शेतकरी आणि नागरिकांना प्रतीक्षा आहे. पावसाअभावी अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. महामार्गावर दारू खुलेआम महामार्गावर ५०० मीटर क्षेत्रातील दारू दुकाने बंद केली असली तरी प्रत्यक्षात आजही तेथे वाईन बार, हॉटेल, ढाबे येथून सर्रास दारू विक्री सुरू असल्याचा प्रकार किशोर तिवारी यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिला. महामार्गावर पोलीस व एक्साईजच्या ‘आशीर्वादा’ने दारू विक्री सुरू असल्याचे ते म्हणाले.