शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महसूल भवनात भरविला विद्यार्थ्यांचा वर्ग

By admin | Updated: July 17, 2016 00:43 IST

वणी शहरातील २०० वर विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही महाविद्यालयांमध्ये विज्ञान व वाणिज्य

अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर : चार दिवसांचा अल्टीमेटम वणी : वणी शहरातील २०० वर विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही महाविद्यालयांमध्ये विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. दरम्यान, शनिवारी येथील काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क येथील महसूल भवनात ११ वीचा वर्ग भरविला. अतिशय शांततेने पार पडलेल्या या प्रतिकामत्मक आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी महसूल भवनात पोहचले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील अडचणी समजून घेतल्या. मार्गदर्शनही केले. यावेळी १७० विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. न्यायासाठी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या नावाने स्थापन केलेल्या समितीचे पदाधिकारी स्वप्नील धुर्वे, विकेश पानघाटे, नगरसेवक अखिल सातोकर, प्रविण खानझोडे, नगरसेवक सिद्धीक रंगरेज, श्रीकांत ठाकरे, ज्ञानदीप निमसटकर, वैभव डंबारे, संदेश तिखट आदींनी लढा सुरू केला आहे. या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथे जाऊन शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिक्षणाधिकाऱ्यांनी वणीतील काही महाविद्यालयांना पत्र देऊन संबंधित विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश देण्याच्या सूचना केल्या. मात्र आमच्याकडे जागाच शिल्लक नसल्याने आम्ही प्रवेश देण्यास हतबल आहोत, अशी भूमिका महाविद्यालयांनी घेतली आहे. परिणामी आजही २०० वर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी शनिवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क महसूल भवनातच ११ वीचा वर्ग भरविला. राष्ट्रगितानंतर वर्ग सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांची हजेरीही घेण्यात आली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा व पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी महसूल भवनात दाखल झालेत. त्यांनी प्रवेशाबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. (कार्यालय प्रतिनिधी)