शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सर्व गोरगरिबांना दोन वर्षात हक्काची घरे

By admin | Updated: February 11, 2017 00:11 IST

केंद्र आणि राज्य शासन जनतेच्या हिताच्या योजना राबवित असून शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व कष्टकऱ्यांच्या पाठीशी

देवेंद्र फडणवीस : पुसद येथे जाहीर सभा पुसद : केंद्र आणि राज्य शासन जनतेच्या हिताच्या योजना राबवित असून शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व कष्टकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे आहे. येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व गोरगरिबांना हक्काचे घरे देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला आमदार राजेंद्र नजरधने, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, पोहरादेवीचे संत रामराव महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात २०१४ मध्ये भाजपा-सेना युतीची सत्ता आहे. त्यावेळी राज्याची तिजोरी रकामी होती. जनतेच्या हिताच्या असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजना राज्य शासन राबवित आहे. केंद्र शासन घरकूल योजना राबवून २०२२ पर्यंत गरिबांना मोफत घरे देणार आहे. मात्र राज्य शासन येत्या २०१९ पर्यंतच घरकुलाचा प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाच वर्षात तब्बल २० हजार गावे दुष्काळमुक्त करून साडेसहा लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी भाजपा नेते अ‍ॅड. नीलय नाईक यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नंतर समाजाचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असून भाजपावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी शेंबाळपिंपरी येथील शिवसैनिक, वरुड येथील आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजपात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रचार सभेला पुसद तालुक्यातील भाजपाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद जिल्हेवार यांनी तर आभार निखील चिद्दरवार यांनी मानले. (प्रतिनिधी)