शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पुसद शहर व तालुका बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

शहरात रविवारी अरुण ले-आऊटमधील एका ४४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या सात तर रॅपिड टेस्टमध्ये वसंतनगरमधील एक परिचारिका व गढी वॉर्डातील दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देएकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह : अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हची संख्या पोहोचली ३१ वर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला. रविवारी एकाच दिवशी तब्बल ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोमवारी त्यात आणखी दोन पॉझिटिव्हची भर पडली. त्यामुळे पुसद शहर व तालुका कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनल्याचे दिसून येत आहे.शहरात रविवारी अरुण ले-आऊटमधील एका ४४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या सात तर रॅपिड टेस्टमध्ये वसंतनगरमधील एक परिचारिका व गढी वॉर्डातील दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी रामनगरमधील ३५ वर्षीय व्यापारी व संभाजीनगर येथील एका खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ३० वर्षीय परिचारिकेचा कोरोना अहवाल रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरात आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४५ झाली आहे. त्यापैकी १३ जणांनी कोरोनावर मात केली. तर एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.शहरात सध्या गढी वॉर्ड, अरुण ले-आऊट, पार्वतीनगर आणि रहेमतनगर हे चार प्रतिबंधित क्षेत्र आहे. येथील आयुर्वेद महाविद्यालाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये रविवारी रॅपिड टेस्ट केलेल्या २९ पैकी २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.त्यांना सुटी देण्यात आल्याचे नोडल आॅफिसर डॉ.हरीभाऊ फुपाटे यांनी सांगितले. आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या ५२ पैकी ४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी दिल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले. या सेंटरमधील एकाचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. सदर नागरिक बीआरसीचा क्लार्क आहे.प्रशासन दक्ष नागरिक मात्र बिनधास्तचकोरोनाच्या वाढत्या संसर्गाने प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळल्यास स्वत:हून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी केले. तसेच नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तातडीने रॅपिड टेस्ट तपासणी करण्याचेही आवाहन केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या