मारेगाव : तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या नेतृत्वात विदर्भ तलाठी संघ व विदर्भ मंडळ अधिकारी उपविभाग वणीतर्फे सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर मारेगाव महसूल मंडळातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून एक दिवसीय धरणे आंदोलन केले.राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत संगणकीकृत सातबारा, नेट कनेक्टीव्हिटी, सर्व्हरची स्पिड, तलाठी साझ्याची पुनर्रचना करणे, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यात याव्या, अवैध गौण खनिज कामातून तलाठ्यांना वगळण्यात यावे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालय बांधून देणे, खात्याअंतर्गत २५ टक्के सरळसेवाची पदे राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करणे, आदी मागण्यांच्या पूर्ततेकरिता हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.आंदोलनात विदर्भ मंडळ अधिकारी संघाचे उपाध्यक्ष डी.एम.मडावी, मंडळ अधिकारी के.एस.भगत, आर.आर.मादेशवार, तलाठी आर.टी.डवरे, एम.जी.चिकनकर, यु.व्ही.घोटकर, एस.बि.शिंदे, आर.एस.वाघमारे, आर.एम.वरारकर, एम.जी.बदखल, जे.आर.शेख, एस.डी.राठोड, अे.बी.पिंपरकर, जी.ए.कुमरे, एस.एल.खैरे, व्ही.एच.थिटे, ए.आर.राजूरकर, टी.के.खोब्रागडे, डी.जी.काळे, एम.जी.बोपचे, एन.एन.पाढेण, व्ही.एम.जिवतोडे, एस.एम.कनाके आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)
मंडळ अधिकारी, तलाठ्यांचे एक दिवसीय धरणे
By admin | Updated: November 9, 2016 00:33 IST