शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमागृह व्यावसायिकांना पावणेपाच कोटींच्या आर्थिक नुकसानीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST

सिनेमागृह चालकांपुढे कोरोनानंतर सर्वात मोठी अडचण आहे ती नव्या चित्रपटांची. डिस्ट्रीब्युटरकडून जुनेच चित्रपट दाखविण्यासाठी तगादा लावला जात आहे. ५० टक्के क्षमतेत शो होणार आहे.

ठळक मुद्देजुन्या चित्रपटांवरच दिवाळी : प्रेक्षक फिरकतील का याची साशंकता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मार्च महिन्यापासून कोरोना संकटामुळे यवतमाळातील दोन टॉकीज व एक मल्टीप्लेक्स बंद आहे. येथे नऊ महिन्यापासून लागलेले कुलूप दिवाळीच्या मुहूर्तावर उघडण्यात आले. अजूनही कोणत्याच टॉकीजमध्ये सिनेमाचा शो ऑन झाला नाही. सिनेमागृह साफसूफ करण्याचे काम सुरू आहे. टॉकीजवर कार्यरत स्टाफही नऊ महिन्यांपासून बंद असल्याने मालकांना त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.सिनेमागृह चालकांपुढे कोरोनानंतर सर्वात मोठी अडचण आहे ती नव्या चित्रपटांची. डिस्ट्रीब्युटरकडून जुनेच चित्रपट दाखविण्यासाठी तगादा लावला जात आहे. ५० टक्के क्षमतेत शो होणार आहे. या उलट टॉकीज चालविण्याचा खर्च दुप्पट झाला आहे. प्रेक्षकांना भावणारे चित्रपट नसल्याने दिवाळीच्या सुटीतही प्रेक्षक सिनेमागृहाकडे येतील की नाही याची साशंकता आहे. जुने चित्रपट टॉकीजमध्ये येवून पाहणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे टॉकीज व्यावसायिकांचेही अद्याप तळ्यातमळ्यात सुरू आहे.सिनेमागृहात काय काळजी घेतली जाते?यवतमाळात दोन जुन्या टॉकीज व एक मल्टीप्लेक्स आहे. या ठिकाणी एकूण बैठक क्षमतेच्या ५० टक्केच तिकीटांची विक्री केली जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी मधातली खुर्ची रिकामी ठेवली जात आहे. शिवाय सॅनिटायझर आणि शो संपल्यानंतर निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्याचे नियोजन येथे केले आहे.यंदाच्या दिवाळीत सिनेमा दाखविण्याचाच प्रश्ननवे सिनेमे नसल्याने दिवाळीत दाखवायचे काय, असा प्रश्न टॉकीज चालकांना आहे. त्यात युपोचा खर्च टॉकीज चालकावर लादला जात आहे. प्रोड्युसरकडून सवलत मिळण्याची गरज आहे. युपोचे भाडे कमी केले तरच डिस्ट्रीब्युटर व टॉकीज चालक यांना काही तरी करता येणार आहे. अशी स्थिती निर्माण झाली आहे.टॉकीज व मल्टीप्लेक्स चालक पुरते बरबाद झाले आहे. नऊ महिन्यानंतर थिएटर सुरू करावे तर नव्या चित्रपटांची समस्या आहे. जुने सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक येतील काय याची साशंकता आहे. शिवाय अनेक महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह सुरू करण्यावरच मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडात भर पडत आहे.- विलिन इंगळेकर,मल्टीप्लेक्स चालकआठवड्यातून एकदा चित्रपट बघत होतो. कोरोना संकटामुळे नऊ महिन्यांपासून सिनेमागृहात जावून चित्रपट बघितला नाही. आता दिवाळीच्या सुट्यांमध्ये ती संधी आहे. तर बिग बजेटचे चित्रपट रिलिज झालेले नाहीत. सिनेमागृहाकडे आकर्षित करतील असे चित्रपट यावर्षी आलेच नाहीत. त्याची प्रतीक्षा आहे.- प्रतीक पवार, यवतमाळ