शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वसंत कारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी चुरस

By admin | Updated: May 12, 2016 02:44 IST

वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अविरोध होतानाच अध्यक्षपदाची माळ माधवराव पाटील यांच्या गळ्यात टाकण्यात आली.

आज निवड : नाईक गट की भाजपा ?उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अविरोध होतानाच अध्यक्षपदाची माळ माधवराव पाटील यांच्या गळ्यात टाकण्यात आली. परंतु आता खरी चुरस उपाध्यक्षपदासाठी असून गुरुवारी होणाऱ्या उपाध्यक्षपदाच्या निवडीत नाईक गटाचा उपाध्यक्ष होतो की भाजपाचा, यावर रस्सीखेच सुरू आहे.आर्थिक अडचणीत सापडलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अविरोध करण्यात आली. त्यात १९ संचालक निवडण्यात आले. माधवराव पाटील गटाला अध्यक्षपद तर नाईक गटाचे कल्याणराव माने, विजय जाधव, रमेश चौधरी, रतीराव राऊत, रेखाताई वानखडे, काँग्रेस गटाचे माधवराव जवळगावकर, विलास मोरे, रमण रावते, शिवाजी देशमुख, साहेबराव खडसे, भाजपा गटाचे चितांगराव कदम, अ‍ॅड.माधवराव माने, प्रदीप देशमुख, आनंदराव चिखले, प्रकाश पाटील देवसरकर गटाचे कृष्णा पाटील देवसरकर, नानाराव चव्हाण, अ‍ॅड.राजू मोतेवार, कमलताई नाईक यांची निवड करण्यात आली.याचवेळी माजी आमदार माधवराव पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले. तर उपाध्यक्षपदासाठी आता रस्सीखेच होत आहे. उमरखेड बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर हे माजी अध्यक्ष प्रकाश देवसरकर यांचे बंधू आहे. आपल्या परिवारात उपाध्यक्षपद राहावे, यासाठी धडपड सुरू आहे. परंतु त्यांच्या नावाला संचालक मंडळाचा विरोध होत आहे. नाईक गटाकडून वसंतचे अनेक वर्ष उपाध्यक्ष असलेले के.डी. जाधव यांचा मुलगा विजय जाधव व माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांचे समर्थक रमेश चौधरी या दोघांपैकी एकाच्या गळ्यात माळ पडू शकते, तर भाजपाकडून अ‍ॅड.माधवराव माने, चितांगराव कदम यांची नावे समोर आली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपाचा कारखान्यावर झेंडा लागावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच कारखान्याच्या आर्थिक अडचणी सत्ताधारी दूर करू शकतात. त्यामुळे माजी खासदार सुभाष वानखडे, आमदार राजेंद्र नजरधने मोठी ताकद लावून आहे. आमदार मनोहरराव नाईक यांची संमती असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे भाजपाला उपाध्यक्षपद मिळण्याची दाट शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)नाईकांची भूमिका महत्त्वाचीवसंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० हजारांपेक्षा अधिक ऊस उत्पादक उमरखेड तालुक्यात आहे. अध्यक्षपद मात्र दोन्ही देवसरकरांना शह देण्याच्या प्रयत्नात मराठवाड्याकडे गेले. आता उपाध्यक्षपदाच्या निवडीत आमदार मनोहरराव नाईक यांची भूमिका महत्त्वाची राहात असून माजी खासदार सुभाष वानखडे आणि मनोहरराव नाईक यांची गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड.माधवराव माने किंवा चितांगराव कदम यांचे नाव पुढे येवू शकते.