शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

सूत गिरणीच्या एका जागेसाठी चुरस

By admin | Updated: June 16, 2016 02:56 IST

तालुक्यातील पिंपळगाव येथील बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीच्या एका जागेसाठी निवडणूक होऊ घातली आहे.

२० संचालक अविरोध : बाबासाहेब नाईक सूत गिरणी निवडणूकमहागाव : तालुक्यातील पिंपळगाव येथील बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीच्या एका जागेसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीने तालुक्याचे राजकारण ढवळून निघत असून पूर्वीचे दुखावलेले संचालक आणि विरोधी गट एकवटल्याने चुरस वाढली आहे. यापूर्वी नाईक पॅनचे २० संचालक अविरोध आले आहेत. सूत गिरणीची निवडणूक अविरोध झाली असती तर गिरणीतील अंतर्गत अनियमितता बाहेर आली नसती. राखीव जागा असल्यामुळे फारसे कोणी लक्ष देणार नाही, या भावनेतून सत्ताधारी गटाने दुर्लक्ष केले. मात्र पुसद तालुका भाजपा अध्यक्ष विश्वास भवरे रिंगणात उतरले. त्यांच्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, विनोद जिल्हेवार परिश्रम घेत आहेत. सूत गिरणीच्या माध्यमातून भाजपा आपली सहकारातील ताकद आजमावून पाहात आहे. सूत गिरणीत पराभव झाला तरी भाजपाचा चेहरा म्हणून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत नाईकांच्या मोहऱ्याविरुद्ध लढण्यासाठी भवरे यांची रंगीत तालीम सुरू आहे.पुसदमधील नेते पक्ष मतभेद बाजूला सारून विश्वास भवरेच्या प्रचारात गुंतल्याचे चित्र आहे. सूत गिरणीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजपाचा हा प्रयत्न आहे. कापूस उत्पादकांच्या भरोशावर उभी राहिलेल्या सहकारी संस्थेत कापूस उत्पादक वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. गिरणीत खरेदी विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता राहिली नाही, असा जाहीर आरोप भाजपने केला आहे. सुरुवातीला सहज वाटणारी ही निवडणूक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता कुठे मनावर घेतली आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप होवू लागल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली आहे. सर्वत्र निवडणुकीची चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)