शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

वाटमारी करणाऱ्या तिघांना दिला चोप

By admin | Updated: March 16, 2015 01:50 IST

यवतमाळ मार्गावरील इचोरी फाट्यावर रविवारी सायंकाळी ५.३० वाजता एका दुचाकीस्वाराला तिघांनी अडवून बेदम मारहाण करत रक्कम हिसकावली.

बोरीअरब: यवतमाळ मार्गावरील इचोरी फाट्यावर रविवारी सायंकाळी ५.३० वाजता एका दुचाकीस्वाराला तिघांनी अडवून बेदम मारहाण करत रक्कम हिसकावली. या घटनेची माहिती दुचाकीस्वारने आपल्या मित्रांना दिली. त्यावरून मित्रांनी शोध घेतला असता जामवाडी धाब्यावर मद्य प्राशन करताना आरोपी आढळले. त्या तिघांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी नरेंद्र बाळकृष्ण सुखदेवे (३५), नरेंद्र वसंतराव रंगारी (२८) दोघेही रा. इचोरी, सैय्यद अजमल अमन (३३) रा. यवतमाळ अशी वाटमारी करणाऱ्यांची नावे आहे. आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील आशीष नागेलवार दुचाकीने दारव्हा येथे जात होता. त्याला इचोरी फाट्याजवळ पल्सरवर आलेल्या तिघांनी अडविले. बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख दीड हजार आणि मोबाईल हिसकावून घेतला. या घटनेने भयभीत झालेला आशीष परत भोयरजवळच्या पेट्रोलपंपावर आला. त्याने घटनेची माहिती राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस विवेक गावंडे याला दिली. त्यानंतर मित्रांसह आशीष याने घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध घेणे सुरू केले. जामवाडी धाब्यावर तीनही आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. या तिघांना तिथेच चांगला चोप दिला. दुचाकीसह लाडखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर वाटमारीचा गुन्हा नोंदविला.(वार्ताहर)