शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कळंब येथे चिंतामणी जन्मोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:25 IST

विदर्भाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी जन्मोत्सव आणि गणेश याग यज्ञास येथे ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. १७ फेबु्रवारीपर्यंत चालणाऱ्या या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे आहे.

ठळक मुद्दे५ फेब्रुवारीपासून उत्सव : विविध कार्यक्रमांची रेलचेल, गायत्री परिवारातर्फे विराट दीपयज्ञाचे आयोजन

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : विदर्भाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी जन्मोत्सव आणि गणेश याग यज्ञास येथे ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. १७ फेबु्रवारीपर्यंत चालणाऱ्या या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे आहे.५ फेब्रुवारीला श्री क्षेत्र कोटेश्वर येथे पूजा व अभिषेक, कलश पूजन, तीर्थस्थापना, ध्वजारोहण श्रींची पूजा व अभिषेक आदी कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९.३० वाजता चिंतामणी देवस्थान येथे मुंगसाजी सेवाश्रम कोल्हापूर (सिंगारवाडी) येथील अमरानंद भारती यांचे प्रवचन होईल. ६ व ७ फेब्रुवारी रोजी अमरानंद भारती यांचे प्रवचन होईल. ८ रोजी दुपारी १२ वाजता गणेश जन्म, श्री गणेश जन्माचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी महाआरतीच्या वेळी श्रींच्या कलशावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. करण्यात येणार आहे. ९ रोजी अमरानंद भारती यांचे प्रवचन, १० रोजी महारूद्र हनुमान मंदिराच्या प्रांगणात महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी गायत्री परिवारातर्फे विराट ज्ञान दीपयज्ञ आयोजित आहे.११ फेब्रुवारीला काल्याचे कीर्तन, दुपारी १ वाजता श्रींची द्वारयात्रा, मिरवणूक व सायंकाळी ५ वाजता दहिहांडी फोडली जाईल. १२ रोजी साई भजन होईल. दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ वाजता काकड आरती व हरिपाठ, श्रींना महाभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, साग्रसंगीत नित्य आरती, प्रवचन, श्री गणेश पुराण वाचन, सामूहिक हरिपाठ, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.कार्यक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती देवस्थान समितीने केली आहे.आंतरराज्यीय हास्यकविंचे संमेलन१३ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘हास्य कविसंमेलन’ होणार आहे. यात आंतरराज्यीय हास्यकवी किरण जोशी, नम्रता नमिता (भोपाळ), डॉ.संतोष मुजुमदार (कोलकाता) व कपील बोरुंदिया सहभागी होतील. १४ ला सुधीर महाजन यांचे गीतरामायण, १५ रोजी प्रवीण तिखे यांचा ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ हा विनोदी कार्यक्रम सायंकाळी ७.३० वाजता सादर होईल. १६ रोजी ‘नुपूर’ हा शास्त्रीय नृत्याविष्कार शिल्पा थेटे सादर करतील. १७ फेब्रुवारीला अरविंद भोंडे (अकोला) यांचा ‘कार्यक्रम असा की, पोटभर हसा’ हा मनोरंजनातून जनप्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.