शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘चिंतामणी’ला ७२ किलो चांदीचा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:17 IST

विदर्भाचे आराध्य दैवत चिंतामणीच्या मूर्तीला विजया-दशमीच्या मुहूर्तावर ५१ किलो चांदीपासून आकर्षक तेवढाच मोहक साज (प्रभावळ) करण्यात आला होता. आता त्यात आणखी २१ किलो चांदीपासून बनविलेल्या विविध आभूषणांची भर पडली आहे.

ठळक मुद्देकळंब येथे भक्तांचे दान : छत्र, मुकूट, कमरपट्टा आणि हार, गाभाऱ्याचे रूपही पालटले

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : विदर्भाचे आराध्य दैवत चिंतामणीच्या मूर्तीला विजया-दशमीच्या मुहूर्तावर ५१ किलो चांदीपासून आकर्षक तेवढाच मोहक साज (प्रभावळ) करण्यात आला होता. आता त्यात आणखी २१ किलो चांदीपासून बनविलेल्या विविध आभूषणांची भर पडली आहे.यापूर्वी मूर्तीला सजविण्यासाठी एकूण ५१ किलो शुध्द चांदीचा वापर करण्यात आला. यापैकी ४० किलो चांदी भक्तांनी दान दिली होती तर, ११ किलो चांदी देवस्थान व्यवस्थापनाने खरेदी केली. आता पुन्हा मूर्तीच्या डोक्यावरील छत्र, मुकुट, कमरपट्टा व हार तयार करण्यात आला आहे. शुध्द चांदीपासून बनविलेल्या या आरासामुळे मूर्तींच्या गाभाऱ्याचे रूप पूर्णत: पालटले आहे. खामगाव येथील डॉ.कमल जांगिड यांच्या मार्गदर्शनात सतत ११ दिवस अहोरात्र काम करुन ही कलाकृती साकारण्यात आली. यवतमाळ येथील डॉ. सुरेंद्र भुयार व डॉ.स्रेहा भुयार या दाम्पत्यांनी पाच किलो चांदी दानात दिली. उर्वरीत चांदी भक्तांनी दान दिलेली तर काही देवस्थान प्रशासनाने खरेदी केली.पुढील काळात मूर्तीच्या चरणाजवळ रिध्दी व सिध्दी यांच्या चांदीच्या मूर्त्यां विराजमान करण्याचा मानस आहे. यासाठी भाविकांनी दिलेल्या चांदीचा प्राधान्याने वापर केला जाणार आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, सचिव श्याम केवटे यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.शिव जटेतून गंगा अवतरणमूर्तीच्या दोनही बाजूला देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर अतिशय मनमोहक पध्दतीने साकारण्यात आला आहे. तीन ठिकाणी कलशाची प्रतिकृती रेखाटली आहे. यासोबतच शिवजटेतून गंगा अवतरलेली दाखविण्यात आली आहे. सर्व अलंकारावर पाचफणी नाग, राष्ट्रीय पक्षी मोर व दोन्ही बाजूला गजराज साकारले आहे. यातील कलाकुरस अतिशय बारकाईने कोरण्यात आले. यातून धार्र्मिक पावित्र्य आणि महत्व विशद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.