पुसदचे कलावंत : इटली येथे करणार भारताचे प्रतिनिधीत्व पुसद : येथील नटराज डान्स अकॅडमीच्या १० वर्षाखालील चिमुकल्यांची इटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे चिमुकले कलावंत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पोटर्स डान्स फेडरेशन आॅफ इंडिया आणि स्पोटर्स डान्स असोसिएशन कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने म्हैसूर येथे दुसरी राष्ट्रीय स्पोटर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुसद येथील नटराज डान्स अकॅडमीच्या तनिष्का डांगे, केयूर कुबडे, चिराग वट्टमवार, लाजरी देऊरकर, समृद्धी घुले, श्रावणी येरावार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. येथे सदाबहार लावणी नृत्य सादर करून सुवर्ण पदकासह अव्वल येण्याचा मान पटकाविला. ग्रामीण भागातून आलेल्या या बाल कलावंतांनी राष्ट्रीयच नव्हेतर आता आंतरराष्ट्रीयस्तरावर भरारी घेतली आहे. इटली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या कलावंतांना नृत्य दिग्दर्शक अमोल भालेराव यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
चिमुकल्यांचा आंतरराष्ट्रीय नृत्याविष्कार
By admin | Updated: July 15, 2016 02:41 IST