शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाळ अपहरणाने सुरक्षेची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:22 IST

येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण झाल्याने ग्रामीण रूग्णालयाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देग्रामीण रूग्णालय : प्रभार न देता अधीक्षक रजेवर, सीसीटीव्ही कॅमेरे बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण झाल्याने ग्रामीण रूग्णालयाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून याविषयी संताप व्यक्त होत आहे. अता या घटनेनंतर प्रशासन कोणते पाऊल उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.येथील ग्रामीण रूग्णालयाची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. शहराच्या ५० हजार गोरगरिब नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणारे ग्रामीण रूग्णालयच आजारी झाले आहे. ही बाब येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा वैद्यकीय अधीक्षक व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र प्रशासनने ही बाबच गंभीरतेने न घेतल्याने आज दवाखान्यातून बाळाचे अपहरण करण्यापर्यंत असामाजिक घटकांची मजल गेली आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. शासन महिलेची प्रसुती दवाखान्यातच करण्याचा आग्रह धरतात. मात्र त्याची सोय करून देण्याची जबाबदारी कोणी घेत नाही.येथील अस्वच्छता कळसाला पोहोचली आहे. त्यामुळे या रुग्णालयात उपाचार घेणाºया रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नसल्याने रूग्णांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. सुरक्षा तर जणू वेशीवर टांगली आहे. या रुग्णालयात सुरक्षा रक्षकाची नियुक्ती नाही. घटनेच्या रात्री प्रसुती वॉर्डाचे दार रात्रभर सताड उघडे होते. रात्री रूग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. हे कर्मचारीही रूग्णांना मोकाट सोडून झोपा घेत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.दवाखान्यातील सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विविध वॉर्डात व परिसरातील नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र या कॅमेºयामध्ये दृश्य साठवून ठेवले जात नाही. जेव्हा बाळाच्या अपहरणाची घटना घडली. त्यावेळी कॅमेºयाची तपासणी केली असता, त्यामधील हार्डडीस्क गायब असल्याचे निदर्शनास आले.मनसेच्या निवेदनाला प्रशासनाकडून केराची टोपलीयेथील ग्रामीण रूग्णालयातील असुविधेबाबत मनसेने ८ नोव्हेंबरलाच वैद्यकीय अधिकाºयांना निवेदन देऊन सतर्क केले होते. यापूर्वीही अनेकदा मनसेने निवेदने दिली. मात्र आरोग्य विभागाने ग्रामीण रूग्णालयातील कारभार सुधारण्याकडे लक्षच दिले नाही. आता तर आमच्यावर केसेस झाल्या तरी चालेल पण रूग्णालयाची व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी आंदोलन करू, असा इशारा रूग्ण सेवा केंद्राचे अध्यक्ष धनंजय त्रिंबके यांनी दिला आहे.