शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनासाठी पायाळू सुनेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:25 IST

घरात गुप्तधन असल्याचा दावा करून ते काढण्यासाठी एका विवाहितेचा अनन्वित छळ करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे.

ठळक मुद्देटाकळीतील घटना : मांत्रिकासह सासरच्या पाच जणांविरूद्ध गुन्हा

ऑनलाईन लोकमतवणी : घरात गुप्तधन असल्याचा दावा करून ते काढण्यासाठी एका विवाहितेचा अनन्वित छळ करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी मांत्रिकासह, विवाहितेचा पती, सासू व सासऱ्यासह पाचजणांविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यात प्रतिबंधक अधिनियम सन २०१३ कलम तीन जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्ह्याचाही समावेश आहे.भालर येथील प्रकाश राजूरकर यांच्या भावना नामक मुलीचा विवाह मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील गजानन डाहुले याच्याशी ४ एप्रिल २०१७ रोजी पारंपरिक पद्धतीने झाला होता. यावेळी राजूरकर कुटुंबाने लग्नाच्या खर्चापोटी डाहुले कुटुंबाला दोन लाख रुपये दिले होते. त्यानंतरही डाहुले कुटुंबाच्या मागणीनुसार भावनाचे वडिल प्रकाश राजूरकर यांनी वेळोवेळी पैैसे दिले. मात्र यामुळे डाहुले कुटुंबाचे समाधान झाले नाही. लग्नाला अवघे काही महिनेच झाले असताना सन २०१७ च्या आॅक्टोबर महिन्यात एका नव्याच प्रकाराला भावनाला सामोरे जावे लागले. आपल्या घरात गुप्तधन आहे. तू पायाळू आहेस, त्यामुळे गुप्तधन काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या पूजेला तू बस, असा हट्ट भावनाचा पती गजाननने धरला. त्यातून तिला अनेकदा मारहाणही करण्यात आली. गुप्तधन काढण्यासाठी राळेगाव तालुक्यातील येवती येथून नानाजी कुबडे नामक मांत्रिकाला पाचारण करण्यात आले. ठराविक दिवशी हा मांत्रिक घरातच पूजा मांडायचा. भावनाला पूजेवर बसवून तिच्या हातावर काजळी लावली जायची. त्यानंतर तिचा वेगवेगळ्या पद्धतीने छळ केला जायचा, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर भावना आपल्या माहेरी निघून आली. यासंदर्भात शनिवारी भावनाने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिक नानाजी कुबडे, पती गजानन डाहुले, सासरा अशोक धर्माजी डाहुले, सासू सविता अशोक डाहुले, दिर राजू अशोक डाहुले यांच्याविरुद्ध भादंवि ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झाली नव्हती.कारवाईसाठी पोलिसांकडून विलंबहोत असलेल्या अत्याचाराबाबत भावनाच्या कुटुंबांनी अनेकदा मारेगाव पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजविले. मात्र सुरूवातील तक्रारच घेण्यात आली नाही. एकदा घेतली. मात्र अनेक दिवस त्यावरही कारवाई करण्यात आली नाही. अखेर शनिवारी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले.