शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:07 IST

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती महोत्सवाचे शुक्रवारी समता मैदानात बाळासाहेब घारफळकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.

ठळक मुद्देप्रबोधनाची पर्वणी : शाहीर शीतल साठे, सचिन माळी यांचा क्रांतीजलसा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती महोत्सवाचे शुक्रवारी समता मैदानात बाळासाहेब घारफळकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर ख्यातनाम शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या क्रांती जलशाने शिवभक्तांना प्रबोधनाची पर्वणी दिली.या प्रसंगी प्रमुख अतिथी वैशाली सवई, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, डॉ. छाया महाले, विजय खडसे, संगीता घुईखेडकर, दर्शना इंगोले, सिद्धार्थ भवरे, अंकुश वाकडे, डॉ. दिलीप महाले, सुदर्शन बेले, राजेंद्र घोंगडे, पप्पू पाटील भोयर, सुशिला भोयर, प्रदीप साळवे, किशोर भगत आदी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी समतावादी राजसत्ता निर्माण केली. आगामी काळात जनतेने शिवाजी महाराजांच्या विचारानुसार वाटचाल करावी, असे यावेळी घारफळकर म्हणाले.सोहम ब्राह्मणकर व अभिजित तरोडे यांचा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. यावर्षीचा संभाजी राजे युवा पुरस्कार हॉकीपटू आकाश चिकटे यांना प्रदान करण्यात आला.क्रांती जलसा सादर करताना शितल साठे यांनी मॉ जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर क्रांतिगीते सादर केली. सांस्कृतिक संघर्षाची चळवळ आपण अधिक जोमाने लढली पाहिजे, असा संदेश साठे यांनी दिला. नक्षलवादी ठरविल्याने सहा वर्षे तरूंग भागावा लागलेले सचिन माळी यांनी ‘लोकशाही’ कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल कडू यांनी केले. सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले. तर आभार विपीन राऊत यांनी मानले. शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज शिवनाट्य पोवाडे स्पर्धासार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील समता मैदानात १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय शिवनाट्य पोवाडे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय देशमुख राहतील. दरम्यान, १८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता बुद्धीबळ स्पर्धा, सकाळी १० वाजता शिवरत्न संगीत सम्राट राज्यस्तरीय गायन स्पर्धा तर सायंकाळी ५ वाजता समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.