शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांचा कारागृहातून कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:34 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबई कारागृहातून राज्यभरातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लढा चालविला आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पीय अधिवेशनतुरुंगाधिकाऱ्यांच्या साक्षीने विधिमंडळात लक्षवेधी सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबई कारागृहातून राज्यभरातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लढा चालविला आहे. त्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात थेट कारागृहातून लक्षवेधी सूचना मांडली आहे.माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेच्या येवला मतदारसंघाचे (जि. नाशिक) आमदार छगन भुजबळ यांनी १ मार्च २०१८ रोजी विधानसभेच्या प्रधान सचिवांना आपली लक्षवेधी सूचना लेखी स्वरूपात मांडली. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) यांच्या समक्ष व स्वाक्षरीने ही लेखी सूचना भुजबळांच्या लेटर हेडवर सचिवांकडे पोहोचली आहे. राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती आणि शासकीय सेवेत सामावून न घेण्याचा ९ फेब्रुवारी २०१८ चा शासन निर्णय लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारा असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. शासनाने हा जीआर तत्काळ रद्द करावा, किमान दहा वर्ष सेवेत असलेल्या कंत्राटींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, त्यासंबंधी धोरणात्मक निर्णय जाहीर करावा, अशी मागणी या लेखी लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. कारागृहात असूनही विधीमंडळाच्या कामकाजात सहभाग घेण्याची भुजबळांची तळमळ या लक्षवेधीतून दिसून येते. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात आहेत.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ