शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

परवानाधारक सावकारांची मालमत्ता, दस्तावेज तपासा

By admin | Updated: October 26, 2016 00:42 IST

जिल्हयात असलेल्या परवानाधारक सावकारांची मालमत्ता व त्यांच्या दस्तवेजांची तपासणी करा,

सचिंद्र प्रताप सिंह : कोरे स्टँप,धनादेश सापडल्यास फौजदारीयवतमाळ : जिल्हयात असलेल्या परवानाधारक सावकारांची मालमत्ता व त्यांच्या दस्तवेजांची तपासणी करा, तसेच वैध, अवैध सावकारांच्या आलेल्या तक्रारीवर छापासत्र राबवावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवणात झालेल्या बैठकीत जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांना दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले व सर्व तालुक्यांचे सहायक निबंधक उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, छाप्यामध्ये जर कोर स्टँप पेपर, धनादेश सापडल्यास त्यांच्यावर तातडीने नवीन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. जिल्हयात परवानाधारक सावकारांची संख्या ही १०८ असून या सावकारांचे रजिस्टर, परवाना, कुटुंबातील सदस्यांची शेती, ७/१२, त्यांच्याकडे जमीन वडीलोपार्जित वारसाने हक्काने आली की खरेदी करण्यात आली, घरातील सदस्यांच्या नावावर असलेली जमीन, इतरांकडून खरेदी करण्यात आलेली जमीन, गहान वस्तुंच्या पावत्या, खाते पुस्तिका, दागिणे यांच्यावर छापासत्र टाकून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या जमीनीची माहिती तहसीलदार व दुय्यम निबंधक यांच्याकडून घेण्याचे आदेश देण्यात आले. ज्या प्रकरणात तक्रार होऊन सावकारांनी तडजोड करीत शेतकऱ्यांच्या जमीनी परत केल्या वा करीत आहे. म्हणजेच त्यांच्या अवैद्य सावकारी निदर्शनात येत असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हयात अवैध सावकारीचे १८९ तक्रारी आल्या असून १२२ प्रकरणांची चौकशी पूर्ण झालेली आहे. ६७ प्रकरणांची चौकशी सूरू असून यातील ५ अवैध सावकारांवर गुन्हे दाखल झाल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी बैठकीत सांगितले. तसेच इतर प्रकरणात अवैध सावकारी सिध्द होत असल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध सावकारी करणारे शासकीय कर्मचारी असल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार व सावकारी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करावी, परवानाधारक सावकारांनी व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात नाव, गाव पत्ता आणि व्याजदर अशा माहितीचे फलक लावले की नाही याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. शासनाच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध सावकारांचे धंदे बंद होणार असून सावकारग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन जिल्हयातील सावकारग्रस्तांकडून पिळवणूक होत असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाकडे कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांना केले आहे.