शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात १० हजार वीजग्राहकांचे चेक बाऊन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 10:58 IST

फेब्रुवारीचे बिल अशाच पद्धतीने भरणाऱ्या तब्बल १० हजार ग्राहकांचे धनादेश बँकेत अनादरित झाले. त्यामुळे महावितरणला बिल मिळाले नाही अन् ग्राहक थकबाकीदार ठरला. उलट बँकांना मात्र ३५ लाख रुपये दंडापोटी मिळाले.

ठळक मुद्देमहिन्यात ३५ लाखांचा दंडमहावितरणची ढिलाई अन् वीज ग्राहकांचे दुर्लक्ष बँकांच्या पथ्यावर

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विजेचे बिल आले तरी अंतिम तारखेपर्यंत भरायचेच नाही, अशी खूणगाठ बहुतेकांनी मनाशी बांधलेली असते. त्यातही अंतिम तारखेला वीज बिल धनादेशाद्वारे भरले जाते. नेमके असे चेक बाउन्स होतात. फेब्रुवारीचे बिल अशाच पद्धतीने भरणाऱ्या तब्बल १० हजार ग्राहकांचे धनादेश बँकेत अनादरित झाले. त्यामुळे महावितरणला बिल मिळाले नाही अन् ग्राहक थकबाकीदार ठरला. उलट बँकांना मात्र ३५ लाख रुपये दंडापोटी मिळाले.फेब्रुवारी महिन्याची वीजबिले ग्राहकांना मार्चच्या शेवटी भरायची होती. बिलाची रक्कम रोख स्वरुपात आणि आॅनलाईनही भरण्याची सुविधा आहे. तरीही राज्यातील तब्बल ७ लाख ग्राहक दर महिन्याला धनादेशाद्वारे बिल भरतात, अशी महावितरणची आकडेवारी आहे. फेब्रुवारीचे बिल धनादेशाद्वारे भरणाऱ्या ग्राहकांपैकी तब्बल दहा हजार ग्राहकांचे चेक बाऊन्स झाले. अशा प्रत्येक चेक पोटी बँकांनी ३५० रुपयांचा दंड वसूल केला. महाराष्ट्रातील एकंदर ग्राहकांच्या चेक बाऊन्स प्रकरणाचा आढावा घेतल्यास बँकांच्या दंडाची रक्कम ३५ लाखांवर पोहोचलेली आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक महिन्यालाच जवळपास दहा हजार चेक बाउन्स होतात, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. एकट्या वीज बिलाच्या धनादेशातूनच बँका वर्षाला सव्वाचार कोटींचा दंड मिळवित आहे.

६०० कोटींचा भरणा आॅनलाईनअमरावती परिमंडळात दर महिन्याला सुमारे ५४ वीज बिलाचे चेक बाऊन्स होतात. गेल्या वर्षभरात ६४९ चेक बाऊन्स झाले. त्यामुळे लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी बिल भरण्यासाठी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या आॅनलाईन सुविधा वापराव्या, असे आवाहन महावितरणच्या अमरावती परिमंडळाने केले आहे.सध्या राज्यातील ३५ लाख ग्राहक महावितरणच्या अ‍ॅपवरून सुमारे ६०० कोटी रुपयांचा बिल भरणा करीत आहेत. महावितरणने ही संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण