शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमची माहिती देऊन फसतात; यात शिकले सवरलेलेच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

ऑनलाईन व्यवहारात प्रत्येक बाबीची पडताळणी करण्याची संधी मिळते. हे ना ते सर्वात कमी किमतीत काय मिळणार, आपले ऑनलाईन व्यवहार सुरळीत राहिले पाहिजे. त्यासाठी केवायसी, बँकिंग ॲप सुरू ठेवण्यासाठी बतावणी केली जाते व यातून गोपनीय माहिती मिळवित बँकेतील पैशावर डल्ला मारला जातो. या घटना सातत्याने घडत आहे; मात्र याचा तपास होत नाही. आरोपींना अटकही केली जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँकिंगचे सर्व व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात. अनेकांनी तर खिशात रोख पैसे वापरणेच बंद केले आहे. मोबाईलच्या माध्यमातून लाखो रुपयांचा व्यवहार सहज करता येतो. हे सर्व तंत्रज्ञान हाताळणारी मंडळी उच्चशिक्षित वर्गातीलच आहेत. त्यामुळे ऑनलाईन फ्राॅडमध्ये अडकणाऱ्यांची संख्या शिक्षितांची तुलनेने जास्त आहे.ऑनलाईन व्यवहारात प्रत्येक बाबीची पडताळणी करण्याची संधी मिळते. हे ना ते सर्वात कमी किमतीत काय मिळणार, आपले ऑनलाईन व्यवहार सुरळीत राहिले पाहिजे. त्यासाठी केवायसी, बँकिंग ॲप सुरू ठेवण्यासाठी बतावणी केली जाते व यातून गोपनीय माहिती मिळवित बँकेतील पैशावर डल्ला मारला जातो. या घटना सातत्याने घडत आहे; मात्र याचा तपास होत नाही. आरोपींना अटकही केली जात नाही. तपासाचा खर्च अधिक होत असल्याने याबाबत टाळाटाळच केली जाते.

७० जणांची फसवणूक   गत पाच महिन्यातजिल्ह्यात मागील पाच महिन्यात एटीएम कार्ड, ऑनलाईन व्यवहार, विविध ॲपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्यांची संख्या ७० आहे. अजूनही अशा घटना सातत्याने घडत आहे. नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. 

०४ तक्रारी येत आहेत दररोजजिल्ह्यात दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे ऑनलाईनच्या प्रकारात फसवणूक झाल्याच्या सरासरी चार तक्रारी दाखल होतात. पोलीस ठाणे स्तरावरून सायबरकडे तपास जातो. 

गुन्हा उघड होतो, अटकेची कारवाई नाहीफसवणुकीच्या गुन्ह्यात सायबरकडून आरोपीचे लोकेशन ट्रेस केेले जाते. पोलीस ठाणे स्तरावरून पुढे त्यावर कुठलीच कारवाई होत नाही. परिणामी गुन्हा प्रलंबित राहतो, असे ४०० गुन्हे प्रलंबित आहे.  

एकाच आठवड्यात चार शिक्षकांना गंडा 

ऑनलाईन व्यवहार हा सुशिक्षितांकडूनच केला जातो. यामध्ये गफलत झाल्यास आर्थिक फटका बसतो. शहरात मागील आठवड्यात अशा चार घटना झाल्या.अवधूतवाडी पोलीस ठाण्याहद्दीतच शिक्षकांना ऑनलाईन फ्राॅडमध्ये लुबाडण्यात आले. योनो ॲपचा वापर अंगलट आला. 

प्रलोभन टाळून वापर सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करताना प्रलोभनाला बळी पडू नये तरच आपण सुरक्षित राहू शकतो. छोटीशी चूकही आपल्या बँक खात्यातील रकमेला धोक्यात आणू शकते. सतर्क राहत समजून-उमजून अधिकृत बाबींचाच वापर केला जावा. जेणेकरून फसवणूक होणार नाही.     - अमोल पुरी, सायबर सेल प्रभारी

 

टॅग्स :atmएटीएमfraudधोकेबाजी