शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नव्या आरएफओंपुढे तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

By admin | Updated: August 31, 2014 00:06 IST

हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर आणि अर्जूना बीटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात आली. त्यानंतर ट्रक फसल्याने तस्करीचा प्रयत्न फसला. याची गंभीर दखल घेत हिवरी वनपरिक्षेत्र

शिवानंद लोहिया - हिवरीहिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर आणि अर्जूना बीटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात आली. त्यानंतर ट्रक फसल्याने तस्करीचा प्रयत्न फसला. याची गंभीर दखल घेत हिवरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागेवर नवे आरएफओ रुजू झाले. मात्र तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. विशेष असे की वन कर्मचाऱ्यांमध्ये अद्यापही तस्करांची दहशत कायम आहे. सुमारे महिनाभरापूर्वी हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर बीटमधील राखीव वनातील कक्ष क्र.४९७ मध्ये तस्करांनी शेकडो सागवान वृक्षाची कत्तल केली. तसेच ट्रकद्वारे या लाकूडसाठ्याची तस्करीही झाली. ही तस्करी एका क्षेत्र सहाय्यकाच्या लक्षात येताच त्याने हिवरीचे तत्कालिन वन परिक्षेत्र अधिकारी एम.एच. मोहिते यांना घटनेची माहिती दिली. मात्र कारवाईच्या भीतीने त्यांनी हा प्रकार तब्बल १५ दिवस दडवून ठेवला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसार माध्यमांच्या मदतीने ही सागवान तस्करी उजेडात आणली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच मनपूर बीटमधून सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठा वाहून नेत असताना ट्रक फसला. त्यामुळे तस्करांनी कारवाईच्या भीतीने तेथून पळ काढला. दरम्यान ही बाब दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. तेव्हा आरएफओ मोहिते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गस्तीदरम्यान ट्रकचा पाठलाग करून तस्करांना गजाआड करण्याचा प्रयत्न केल्याचे वरिष्ठांना सांगितले. मात्र त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला. घटनेचा खुलासाही ते समाधानकारकरित्या सादर करू शकले नाही. याची गंभीर दखल घेत यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी आरएफओ मोहिते यांच्या निलंबनाची शिफारस केली. प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून मंजुरात मिळताच आरएफओ मोहिते यांच्यासह क्षेत्रसहाय्यक, दोन वनरक्षक आणि एक चौकीदार अशा एकूण पाच जणांना निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर त्यांनी वरिष्ठांची मनधरणी करून निलंबन परत घेण्याची गळ घातली. त्यासाठी एका दलालामार्फत प्रयत्नही झाले. मात्र मुख्य वनसंरक्षक गुरमे यांनी त्यांच्या या हालचालींना फारसे गांभीर्याने घेतले नाही. आता नवे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.व्ही. वानखडे रुजू झाले आहे. त्यांच्यापुढे यापूर्वी झालेल्या सागवान कत्तल आणि तस्करीत सहभागी मुख्य सूत्रधाराला व त्याच्या साथीदारांना गजाआड करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.