शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मार्चपूर्वी निधी खर्चाचे आव्हान

By admin | Updated: March 4, 2017 00:51 IST

जिल्हा परिषदेसमोर येत्या ३१ मार्चपूर्वी प्राप्त निधी खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

कोट्यवधींचा निधी : नवीन पदाधिकाऱ्यांना फटका यवतमाळ : जिल्हा परिषदेसमोर येत्या ३१ मार्चपूर्वी प्राप्त निधी खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या निधीतून नवीन पदाधिकारी, सदस्यांना विकास कामे करता येणे शक्य नसल्याने त्यांना फटका बसणार आहे. नवीन पदाधिकारी सत्तारूढ होण्यास अद्याप तीन आठवड्यांचा अवधी आहे. तोपर्यंत मार्च महिन्याची ३१ तारीख उजाडणार आहे. तत्पूर्वीच जिल्हा परिषदेला प्राप्त निधी खर्च करावा लागणार आहे. यापैकी काही निधी शासनाकडे प्रस्ताव पाठवून नव्याने मंजुरी घेऊन पुढील वर्षात खर्ची घालता येणार आहे. मात्र बहुतांश निधी ३१ मार्चपूर्वीच खर्च करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात विभाग प्रमुख व तालुकस्तरीय प्रमुखांची बैठक घेऊन सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. एकट्या बांधकाम विभागाकडे अद्याप दोन कोटी रूपये पडून आहेत. यातून काही कामे सुरू आहे. आचारसंहिता लागू असल्याने काही कामे रखडली होती. आता या कामांनी पुन्हा वेग घेतला आहे. २०१६-१७ मध्ये या विभागाला दोन कोटी ३० लाख ४१ हजारांचा निधी मिळाला होता. या निधीतून कामांचे नियोजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक कामे रखडली होती. आता मार्चचा धसका घेऊन कामांना गती देण्यात आली. ही कामे मार्चपूर्वी पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे. मागील वर्षी प्राप्त निधीतून नवीन पदाधिकारी, सदस्यांना मात्र कोणतेही काम सुचविणे अशक्य आहे. त्यांना आता पुढील वर्षी प्राप्त निधीतूनच आपल्या मतदार संघातील विकास कामांना चालना देता येणार आहे. अर्थात किमान वर्षभर नवीन पदाधिकारी, सदस्यांना मतदार संघातील विकास कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल महिन्यात प्राप्त निधीतूनच त्यांना विकास कामे सुचवता येणार आहे. त्यामुळे नवीन पदाधिकारी, सदस्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)