शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

गोवंश तस्करीविरोधात चक्काजाम

By admin | Updated: July 23, 2016 00:08 IST

गोवंध तस्करीविरोधात लगतच्या पिंपळखुटी येथे हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.

राष्ट्रीय महामार्ग ठप्प : हिंदू रामसेना, बजरंग दल, विहिंपचा सहभाग पाटणबोरी : गोवंध तस्करीविरोधात लगतच्या पिंपळखुटी येथे हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गोवंश बंदी कायदा महाराष्ट्र शासनाने लागू करूनही गोवंश भरलेली वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरून कत्तलीसाठी हैद्राबादकडे जात असल्याचे दिसून येते. या वाहनांना सामाजिक संघटना तथा पोलिसांनी कित्येकदा पकडलेसुद्धा आहे. आत्तापर्यंत अंदाजे १५ ते २० कारवायासुद्धा झाल्या. यावरून राष्ट्रीय महामार्गाने मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या निर्देशानुसार नाकाबंद करण्यात आली असली तरी काही अधिकाऱ्यांमुळे गोवंश तस्करी सुरू असल्याचा आरोप यावेळी हिंदू रामसेनेने केला. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी चौकशी पथक नेमून अतिशिघ्र कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दल व राम सेनेने केली आहे. गोवंश तस्करांचा पाठलाग करताना कित्येकदा तस्करांकडून गोभक्तांच्या वाहनाला धडक दिली जाते. यात जिवीतहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्गावरून होणारी जनावरांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात फोफावली असून गोधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची दखल घेत हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरविले. त्यानुसार पिंपळखुटी येथे दुपारी १२ वाजता हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष तिरूपती कंदकुरीवार, हिंदू रामसेनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर अल्लुरवार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रूपेश शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप धवने, बजरंग जिल्हा आखाडाचे संयोजक सचिन पारोजवार, शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर येरमे, भाजपा शहराध्यक्ष गजानन शिंगेवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन पुल्लीवार, विनोद वकील, गजू राजूलवार, शहारूख खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांनी या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. (वार्ताहर) नाकाबंदीदरम्यान नऊ जनावरांची सुटका पांढरकवडा : केळापूर येथील फिक्स पॉर्इंटजवळ करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान कत्तलीसाठी जाणाऱ्या सात गायी व दोन कालवडींची पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सुटका केली. याप्रकरणी चौैघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरसे हे नाकाबंदी करीत असताना ट्रक क्रमांक टी.एस.१६-यु.ए.७९८६ मध्ये जनावरे नेत असल्याची त्यांना शंका आली. हा ट्रक बाजूला घेऊन त्याची पाहणी केली असता, आतमध्ये सात गायी व दोन कालवडींना अतिशय निर्दयीपणे हातपाय बांधून असल्याचे आढळून आले. या गायीची पोलिसांनी ट्रकमधून सुटका केली. या गायीची किंमत एक लाख ८२ हजार असून८ ट्रकची किंमत सहा लाख रूपये आहे. असा एकूण सात लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक मोहम्मद अमरूद्दीन मोहम्मद नसरूद्दीन (३०) रा.पेरडीकोट, जि.निजामबाद (तेलंगणा), प्रकाश तेलंगे (२५) रा.हुसा, ता.नायगाव (नांदेड), कोरल्ला गंगारेड्डी (५०) रा.पडगलल (तेलंगणा), रंजीत शंकर नामुला (३२) रा.बोदेपेल्ली (तेलंगणा) असे अटकेतील तस्करांची नावे आहेत. (शहर प्रतिनिधी)