शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

स्थायी समिती सभेला सभापतींची दांडी

By admin | Updated: May 15, 2014 23:57 IST

आचारसंहिता शिथील झाल्यानंतर प्रथमच स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. मात्र या सभेला उपाध्यक्षासह चार सभापती गैरहजर होते.

यवतमाळ : आचारसंहिता शिथील झाल्यानंतर प्रथमच स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. मात्र या सभेला उपाध्यक्षासह चार सभापती गैरहजर होते. यावरुन रखडलेली कामे पूर्ण करण्याबाबत पदाधिकारी किती गंभीर आहे, हे दिसून येते. याच सभेत तिवसा येथील डायरियाच्या थैमानाचा मुद्दा गाजला.

जिल्हा परिषदेतील कामे रेंगाळली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संपूर्ण कामकाजच ठप्प होते. अनेक कामांची वर्कऑर्डर होऊनही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. प्रत्यक्षात पदाधिकार्‍यांनाही सोयरसुतक नसल्याचे दिसते. गुरूवारी झालेल्या स्थायी समिती सभेला उपाध्यक्ष ययाती नाईक, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, शिक्षण व आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण, महिला बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर आदी गैरहजर होते. अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी समजाकल्याण सभापती आणि विरोधकांच्या मदतीने सभेत कामकाजाचा आढावा घेतला.

बैैठकीच्या सुरूवातीलाच तिवसा येथील डायरीयाच्या साथीचा मुद्दा चर्चेस आला. गावातील पाणी स्रोतात ब्लिचींग पावडर नसल्याची बाब चौकशीत समोर आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुंदन राठोड यांनी सांगितले. याप्रकरणी दोषी ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिले. त्यानंतर मागील सभेत उपाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रसुतीगृहाचा मुद्यावर दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. चार पंचायत समितीतील शाळा इमारतीच्या निर्लेखनाला मंजुरी देण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी इजारा येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे अभियंत्याने सांगितले. बांधकाम विभागाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील १0 कामे मंजूर झाली आहे. तसेच तिसर्‍या टप्प्यातील सात कामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.

धडक सिंचन विहीर योजनेतील एक हजार १५0 विहिरी रद्द करण्यात आल्या. १४ हजार ८४५ विहिरी होत्या. त्यापैकी सात हजार १५२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. नरेगामध्ये तीन हजार २00 विहिरी रुपांतरित करण्यात आल्या आहे. तर जिल्हा परिषदेच्या चार यंत्रणेकडून एक हजार ३00 विहिरी धडक सिंचन योजनेतून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गव्हर्नमेंट हायस्कूलसाठी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. अद्यापही त्याचे काम सुरू करण्यात आले नसल्याचे गटनेते देवानंद पवार यांनी सभेत सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी हे काम तातडीने सुरू करण्याचे ताकीद दिली. तसेच पवार यांनी माध्यमिक शाळेवर रिक्त असलेल्या १३५ जागांचा मुद्दा उपस्थित केला. पदोन्नतीमुळे रोस्टर निश्‍चित नसल्याने रखडल्याचे शिक्षणाधिकार्‍याकडून सांगण्यात आले. ऑगस्टपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल नरवाडे यांनी महागाव पंचायत समितीला शाखा अभियंता नसल्याचे सांगितले. तसेच अंबोडा-चिखलगाव रस्त्याच्या कामाची पुनर्निविदा करण्याची मागणी केली. (कार्यालय प्रतिनिधी)