शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र वाटपाची चौकशी

By admin | Updated: April 15, 2017 00:22 IST

मारेगाव येथील एका विशिष्ट सेतू केंद्राकडून वितरित करण्यात आलेले विविध प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

दाखल्याविनाच प्रमाणपत्र : मारेगाव तहसीलदारांना मागितला खुलासा वणी : मारेगाव येथील एका विशिष्ट सेतू केंद्राकडून वितरित करण्यात आलेले विविध प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सेतू केंद्रावर तहसीलदारांची असलेली विशेष मर्जी यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. यामुळे आता खुद्द तहसीलदारच अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात मारेगाव येथील विशाल मनोहर किन्हेकर यांनी थेट वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदारांना लेखी स्वरूपात खुलासा मागविला आहे. मारेगाव येथील तहसील कार्यालय परिसरात आशिष विजय येरणे यांचे महा-ई सेवा केंद्र आहे. या केंद्रातूनच विना दाखल्याने प्रमाणपत्र वितरीत केल्याची तक्रार विशाल किन्हेकर यांनी एसडीओकडे केली आहे. महा-ई सेवा केंद्रातून आॅनलाईन पद्धतीने दाखले दिले जातात. या दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे प्रमाणपत्र देता येत नाही. असे असताना येरणे याच्या महा-ई सेवा केंद्रातून अशा आवश्यक कागदपत्राविनाच प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गंभीर बाब ही की, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असताना तसे कागदपत्रे न जोडताही संबंधित महसूल अधिकाऱ्याने सदर प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या कशा, ही बाबही आता चौकशीच्या कक्षेत आहे. सेतू केंद्रातून कोणतेही आवश्यक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित अर्जदाराला त्याच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असते. अर्ज प्राप्तीनंतर सेतू केंद्र संचालक कागदपत्रांची तपासणी करून महा आॅनलाईन या पोर्टलवर सदर कागदपत्रे अपलोड करतो. त्यानंतर संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव जातो. महसूल अधिकाऱ्याने कागदपत्रांची तपासणी करूनच त्यावर डिजीटल स्वाक्षरी करावी, अशी एकूण पद्धत आहे. मात्र मारेगाव येथील आशिष येरणे याच्या सेतू केंद्रातून या पद्धतीला तिलांजली देण्यात आली आहे. याची सखोल चौकशी केल्यास मोठे गौडबंगाल उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येते. त्यात काही महसूल अधिकारीही गुंतले असल्याची चर्चा आहे. (कार्यालय प्रतिनिधी) तहसीलदारांकडून १५ दिवसानंतरही उत्तर नाही विशाल किन्हेकर यांनी आशिष येरणे याच्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मिश्रा यांनी यासंदर्भात मारेगावचे तहसीलदार विजय साळवे यांना ३१ मार्च रोजी पत्र देऊन पाच दिवसांच्या आत स्पष्टीकरणासह खुलासा मागितला. मात्र साळवे यांनी १५ दिवस लोटूनही या विषयात एसडीओंकडे खुलासा सादर न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.