शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या कारभारावर वॉच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’, कागदोपत्री ग्रामसभांना चाप

By अविनाश साबापुरे | Updated: July 20, 2023 13:57 IST

प्रत्येक सभेचे व्हीडिओ अपलोड करण्याचे आदेश, बीडीओ लावणार ‘फिल्टर’

यवतमाळ : केवळ कागदोपत्री ग्रामसभा घेणाऱ्या ग्रामपंचायतींना आता केंद्र सरकारकडून चाप लावला जाणार आहे. प्रत्येक ग्रामसभा, त्यातील निर्णय, त्यातील लोकसहभाग यांचे व्हीडिओ केंद्र सरकारच्या ‘जीएस निर्णय’ मोबाईल ॲपवर अपलोड करण्याचे आदेश केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाच्या प्रकल्प संचालकांनी प्रत्येक जिल्हा परिषदेला तंबी दिली आहे. प्रत्येक ग्रामसभा आता ॲपवर लाइव्ह राहणार असल्याने महाराष्ट्रातील २७ हजार ८९८ ग्रामपंचायतींच्या कारभारावर केंद्राचा थेट वॉच राहणार आहे. 

ग्रामसभा ही गावचा कारभार पाहणारी स्वायत्त संस्था आहे. त्यात सर्व गावकऱ्यांचा सहभाग असतो. परंतु, ग्रामसभा बोलावणे, त्यात सर्वांचा सहभाग घेणे या गोष्टी ग्रामपंचायत सरपंच, सचिव अनेकदा कागदोपत्री करतात. मनमर्जी पद्धतीने निर्णय घेऊन तो ग्रामसभेचा निर्णय म्हणून लादण्याचा प्रकार करतात. काही गावांमध्ये तर ग्रामसचिव आधीच लोकांच्या घरोघरी जावून स्वाक्षऱ्या गोळा करतो आणि नंतर त्यावर ग्रामसभेचा निर्णय लिहून मोकळा होता. या बाबीला चाप लावण्यासाठी केंद्राच्या पंचायतीराज मंत्रालयाने लाइव्ह ग्रामसभेसाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी ‘नॅशनल इनिशिएटिव्ह फाॅर रूरल इंडिया टू नेव्हीगेट, इन्नोव्हेट अँड रिझॉल्व्ह पंचायत ॲट डिसिजन’ म्हणजेच ‘जीएस-निर्णय’ ॲप तयार करण्यात आला आहे. 

आता हा ॲप वापरून ग्रामसभेचा प्रत्येक निर्णय सरकारपर्यंत कसा पोहाचवायचा यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाचे प्रकल्प संचालक आ. सु. भंडारी यांनी १७ जुलै रोजी सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठविले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला याबाबत सूचना देण्याचे निर्देश भंडारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

ॲपवर अशी होणार ग्रामसभा 

- प्रत्येक ग्रामपंचायतीने जीएस निर्णय मोबाईल ॲप डाऊनलोड करावा.- ग्रामसभेतील प्रत्येक निर्णय स्पष्ट करणारा किमान दोन आणि कमाल १५ मिनिटांचा व्हीडिओ रेकॉर्ड करावा.- प्रत्येक निर्णय दर्शविणारा व्हीडिओ ॲपवर अपलोड करावा.- त्यासाठी ई-ग्रामस्वराज पोर्टलचा यूजर आयडी व पासवर्ड वापरावा. - हे व्हीडिओ अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्याची जबाबदारी बीडीओंकडे असेल.- अशा प्रकारे अपलोड केलेल्या व्हीडिओंचा तिमाही अहवाल सरकारला सादर करावा लागेल.

ग्रामसभेचे वेळापत्रक आधीच असेल ‘फिक्स’

विशेष म्हणजे, ग्रामसभा कोणत्या महिन्यात किती तारखेला होणार, याचे पूर्वनियोजित वेळापत्रक सरकारला कळवावे लागणार आहे. त्यासाठी जीएस निर्णय ॲप ‘व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल’शी जोडण्यात आला आहे. या पोर्टलवर ग्रामपंचायतीला आपल्या ग्रामसभांचे शेड्यूल आधीच नमूद करावे लागणार आहे. त्या वेळापत्रकानुसार घेतलेल्या ग्रामसभेतील निर्णय हे ॲपवर अपलोड करावे लागणार आहेत. गंभीर म्हणजे हा ॲप तयार होऊन अनेक दिवस लोटले असताना महाराष्ट्रातील एकाही ग्रामपंचायतीने व्हीडिओ अपलोड केलेला नाही, याबाबत पंचायतीराज मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतlocalलोकल