शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा दहा वर्षांत सात टक्क्यांनी वाढल्या, Railway, post, Health विभागाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 10:42 IST

Central staff vacancies: केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रिक्त जागांचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले आहे. रेल्वे, डाक यासह आरोग्य या महत्त्वपूर्ण विभागांतील जागाही भरल्या जात नाहीत.

यवतमाळ : केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रिक्त जागांचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले आहे. रेल्वे, डाक यासह आरोग्य या महत्त्वपूर्ण विभागांतील जागाही भरल्या जात नाहीत. मागील दहा वर्षांत रिक्त जागांचे प्रमाण सात टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये आठ लाख ८६ हजार ७८४ जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. हा टक्का मंजूर पदांच्या २१.७५ इतका आहे. केंद्र सरकारच्या ७७ कार्यालयांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य, शिक्षण, संरक्षण, कृषी, समाज आदी विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. या विभागाची कामे ढेपाळली आहेत. लोकांची कामे तातडीने निकाली निघत नाहीत. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याची कारणे यासाठी सांगितली जातात.

डॉ. आंबेडकर एम्प्लाॅइज असोसिएशनचे अध्यक्ष संजय थूल यांनी ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिलेली रिक्त जागांची माहिती थक्क करणारी आहे. सन २०१० मध्ये केंद्र शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये ३६ लाख दोन हजार २९५ जागा मंजूर होत्या. यातील ३० लाख ६८ हजार ३५९ कर्मचारी कार्यरत होते. तब्बल पाच लाख ३३ हजार ९३६ जागा (१४.८२ टक्के) रिक्त होत्या.

रिक्त जागांचा टक्का कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत गेला. सन २०२० मध्ये ४० लाख ७७ हजार ६८७ पदे मंजूर होती. त्यातील ३१ लाख ९० हजार ९०३ कर्मचारी कार्यरत आहेत. आठ लाख ८६ हजार ७८४ जागांना (२१.७५ टक्के) भरतीची प्रतीक्षा आहे.  

एकाच वर्षात पाच टक्के रिक्त जागा वाढल्यासन २०१८ ते १९ या एकाच वर्षात रिक्त जागा पाच टक्क्यांनी वाढल्या. २०१८ मध्ये ३८ लाख ६६ हजार ६९१ पदे मंजूर होती. त्यातील ३१ लाख ८० हजार १०० कर्मचारी कार्यरत होते. सहा लाख ८६ हजार ५९१ जागा रिक्त होत्या. रिक्त जागांचा टक्का १७.७६ आहे. सन २०१९ मध्ये ४० लाख ६५ हजार ७८३ मंजूर जागांमधून ३१ लाख ४३ हजार ३४० कर्मचारी कार्यरत होते. तब्बल नऊ लाख २२ हजार ४४३ जागा (२२.६९ टक्के) रिक्त राहिल्या. 

टॅग्स :Governmentसरकारjobनोकरी