शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कापूस संशोधक केंद्राचे पथक पांढरकवडात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 05:00 IST

अवकाळी पावसाने आधीच कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बोंडे अक्षरश: सडून गेली. हे संकट जात नाही तोच गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. त्यामुळे २७ हजार ८०० हेक्टरमधील कपाशी बाधित झाली असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या भागात सर्वाधिक कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. येथील कपाशीला लांब धाग्याच्या कपाशीमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुरूवातीला कपाशीचे अतिशय चांगले पीक होते.

ठळक मुद्देकपाशी, सोयाबीनचे नुकसान I बोंडसड व गुलाबी बोंडअळीग्रस्त पिकांची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील अनेक भागात कपाशीवर बोंडसड व गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. या पिकांची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक वाय.जी.प्रसाद यांनी आपल्या पथकासह पांढरकवडा येथे भेट दिली.अवकाळी पावसाने आधीच कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बोंडे अक्षरश: सडून गेली. हे संकट जात नाही तोच गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. त्यामुळे २७ हजार ८०० हेक्टरमधील कपाशी बाधित झाली असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या भागात सर्वाधिक कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. येथील कपाशीला लांब धाग्याच्या कपाशीमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुरूवातीला कपाशीचे अतिशय चांगले पीक होते. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबरच्या सुरूवातीला झालेल्या परतीच्या पावसाने कपाशीची वाट लावली. आता बोंडसड व गुलाबी बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे उरलेसुरले पीकही वाया जाणार आहे. प्रादूर्भाव झालेल्या या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या या चमुने डोंगरगाव येथील शेतकरी मोहन मामीडवार यांच्या शेतात जाऊन पऱ्हाटीची पाहणी केली. त्यानंतर ही चमू सोनबर्डी येथे गेली व तेथील शेतकरी किसन मंदे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली. त्यानंतर खैरगाव येथील शेतकरी गजानन तोटावार व कृष्णराव देशट्टीवार यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. यावेळी वाय.जी.प्रसाद, किटकशास्त्रज्ञ डॉ.चिन्नाबाबू नाईक, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ.दीपक नगराळे, जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, कृषीभूषण ॲड.रामकृष्ण पाटील, यवतमाळ येथील कृषी अधिकारी आर.डी.पिंपळशेंडे, झरीचे तालुका कृषी अधिकारी ए.एम.बदखल, मारेगावचे तालुका कृषी अधिकारी एस.के.निकाळजे, कृषी अधिकारी ए.एम.बर्डे उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती