शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जयहिंद चौकातील शतकोत्तरी राम जन्मोत्सव

By admin | Updated: April 4, 2017 00:06 IST

येथील श्रीराम जन्मोत्सवाला शतकोत्तर परंपरा आहे. यवत नावाचे गाव असतानाच जयहिंद चौकात हा उत्सव सुरू झाला.

यवतमाळ : येथील श्रीराम जन्मोत्सवाला शतकोत्तर परंपरा आहे. यवत नावाचे गाव असतानाच जयहिंद चौकात हा उत्सव सुरू झाला. या उत्सवाने १२१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. राम जन्मोत्सवाची शोभायात्राही याच ठिकाणावरून निघणार आहे. झिबलाजी कृष्णाजी नव्ही यांनी १८९६ मध्ये जयहिंद चौकातील राम मंदिर पूर्णत्वास आणले. या मंदिराचा संपूर्ण सभामंडप दगडाचा आहे. छतही दगडाचे आहे. सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम सुबक आणि देखणे आहे. १९ व्या शतकामध्ये या मंदिराचे संस्थानामध्ये रूपांतर झाले. त्यावेळी या मंदिराचे काम स्व. परशराम पाटील यांनी पाहिले. त्यानंतर जिरकर आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी बाबाराव राऊत यांनी अखेरपर्यंत काम पाहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिरात स्वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलनाची दिशा ठरत होती. गांधी चौक आणि राम मंदिरातून आंदोलनाची दिशा ठरविण्याचे काम त्या काळात घडले. यामध्ये स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा, दादासाहेब राऊत, बाबाराव राऊत, नानासाहेब मुडे, चंपालाल मोहता यांच्यासह अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा समावेश होता. पूजेची जबाबदारी तत्कालीन पुजारी भानुदास औदार्य यांच्यावर सोपविण्यात आली होती. पुजाऱ्याची राहण्याची व्यवस्था मंदिरातच करण्यात आली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मंदिराचे अध्यक्ष बाबाराव राऊत यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात सभामंडपासह अनेक जिर्णोद्धाराची कामे झाली. विद्यमान अध्यक्ष रत्नाकर राऊत आहे. या मंदिराच्या परिसरात बरीच जागा आहे. सभामंडपाचे बांधकाम आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह इतर सोई करण्यासाठी संस्थान काम करीत आहे.१२१ वर्षे जुने मंदिरसर्वात जुने मंदिर म्हणून या मंदिराला ओळखले जाते. यामुळे रामजन्मोत्सवाची शोभायात्रा या ठिकाणावरून निघण्याची परंपरा राहिली आहे. यावर्षी राम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.