शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पुसदमध्ये शिवजयंती साजरी

By admin | Updated: March 27, 2016 02:22 IST

शिवसेना व मनसेतर्फे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दुचाकी रॅली : शिवसेना-मनसेतर्फे विविध कार्यक्रम पुसद : शिवसेना व मनसेतर्फे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना तालुका प्रमुख विकास जामकर व दीपक परिहार यांच्या नेतृत्वात सकाळी ९ वाजता शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. अ‍ॅड. माधव माने यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. भारतलाल जयस्वाल यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवसेनेचे राजन मुखरे, राजू वाकडे, मोहन विश्वकर्मा, महेश नाईक, परेश देशमुख, रवी पांडे, उमाकांत पापीनवार, मधुकर कलिंदर, भाजपाचे वसंतराव पाटील कान्हेकर, भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे, शहराध्यक्ष भारत पाटील, धनंजय अत्रे, संजय पाटील, विजय पुरोहित, शिवसेनेचे गणेश खटकाळे, राजू वंजारी, अरुण पवार, प्रदीप चव्हाण, प्रल्हाद गुहाडे, संजय पोटे, विलास कोरडे, युवा सेना अध्यक्ष भारत पाटील वानखेडे, शहराध्यक्ष वैभव सुने, संतोष भेंडे, कैलास मस्के, विलास काळे, प्रकाश पाटील, विश्वंभर पाटील, डॉ. पद्मावार, नगरसेवक संतोष धरणे, अवि बहादुरे, दिनेश गवळी, उत्तम खंदारे, दीपक महाडीक, मंगल देवकुळे, संतोष बाबर, सोपीनाथ माने, वासुदेव लंगडे, लहु सेनेचे संजय हनवते, राष्ट्रीय समाज पक्षाचे मधुकर चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, ठाणेदार अनिल कुरळकर, ठाणेदार मानकर आदींनी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. शासकीय रुग्णालयात डॉ. कैलास राठोड, डॉ. विजय सारडा, डॉ. बिरबल पवार, डॉ. पवार, डॉ. जय नाईक, डॉ. सादिक, डॉ. देशमुख, इंगळे यांच्या उपस्थितीत फळ वाटप झाले. मनसेतर्फे सकाळी १०.३० वाजता जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात गगणभेदी गर्जना देण्यात आल्या. जिल्हा सचिव बालाजी कामीनवार यांच्या पुढाकारात वृद्धाश्रमात फळ वाटप झाले. मनसे कार्यालय ते शिवाजी चौकापर्यंत मोटारसायकल रॅली काढून शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास हार घालण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अभय गडम, जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक शिंदे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गिरीष अनंतवार, जिल्हा सचिव बालाजी कामीनवार, तालुकाध्यक्ष प्रशांत त्र्यंकटवार, अश्विन चिरडे, आकाश रहाटे, शहर अध्यक्ष शशांक गावंडे, परिक्षित गडदे, अजय नागठाणे, सतीश गव्हारे, राहुल झिजारे, शुभम कुकडे, सचिन ठाकरे, गोपाल चव्हाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)