शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

जिल्हाभर ईद उत्साहात साजरी

By admin | Updated: July 8, 2016 02:22 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी अमन, शांती आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.

यवतमाळ : जिल्ह्यात ठिकठिकाणी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी अमन, शांती आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. ईदची नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यवतमाळ शहरातील कळंब चौक स्थित इदगाह मैदानावर सकाळी ९.१५ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. जामा मशिदीचे इमाम मौलाना मुमताज अली यांनी हा नमाज अदा केला. यावेळी त्यांनी भाईचारा, प्रेम, सद्भावना जोपासण्याचा सल्ला दिला. चाँदरात्री जकात म्हणून गोळा झालेल्या पैशातून धान्य, मेवा, कपडे आणि फळासह ईदचे साहित्य गरजवंतांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आले. यावेळी लोकसहभागातून गोळा झालेले गहू गरजवंतांच्या घरापर्यंत पोहोचते करण्यात आले.ईदचा नमाज अदा झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण केली. कळंब चौकात सर्वधर्मीय नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस विभागाच्यावतीने गुलाब पुष्प देऊन मुस्लीम बांधवांचे स्वागत करून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. इदगाह मैदानासोबतच ताहेरनगर, अलरजा मशीद, गौसिया मशीद, जामा मशीद, कोहिनूर सोसायटी आणि वडगाव येथेही ईदची नमाज अदा करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, महागाव, आर्णी, नेर, कळंब, बाभूळगाव यासह विविध मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आल्या. दिवसभर ईदनिमित्त उत्साह दिसत होता. ईदनिमित्त सर्वधर्मीय नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छा देत होते. अमन, शांती आणि सुख समृद्धीसाठी सर्वांनीच प्रार्थना केली. (शहर वार्ताहर)